शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एकदऱ्याचे पाणी कोणाच्या पदरात पडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:48 IST

पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण होणार असून, यामध्ये लोकप्रतिनिधींचा मात्र राजकीय कस लागणार आहे.

ठळक मुद्देगोदावरी की गिरणा मोसम पाण्यावरून भविष्यात श्रेयवादाची रंगणार लढत

रामदास शिंदे।पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण होणार असून, यामध्ये लोकप्रतिनिधींचा मात्र राजकीय कस लागणार आहे.नाशिक जिल्ह्याचे क्षेत्र साधारणपणे गोदावरी व गिरणा अशा दोन प्रमुख खोºयांमध्ये विभागले गेले आहे. पेठ, सुरगाणा या दोन तालुक्यात आजही बºयापैकी सरासरीनजीक जाणारा पाऊस पडत असतो; याच तालुक्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या चांदवड, मालेगाव, नांदगाव तालुक्यात मात्र दुष्काळाचे सावट दिसून येत असते. त्यामुळे मांजरपाडापासून एकदºयापर्यंतच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून सदरचे पाणी दिंडोरी व कळवण तालुक्यातील वळण बंधाºयात टाकल्यास नाशिक जिल्ह्यातीत सर्वच दुष्काळी तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार असून, वर्षांनुवर्ष दुष्काळाच्या छायेत अडकून पडलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. यासाठी दुष्काळी तालुक्यातील जनतेने जागे होणे गरजेचे आहे.पाण्यासाठी संघर्षाची भूमिका ठेवून शासनाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता निर्माण झालीआहे. एकदरे वळण बंधाºयाचे पाणी आंबेगणनजीक झारलीपाड्याच्या वळण बंधाºयाद्वारे वाघाड धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असून वाघाड, पालखेडमार्गे येवला, चांदवड, नांदगाव, मालेगावसारख्या तालुक्यांना सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होऊ शकते. दुसरीकडे हेच पाणी गोदावरी खोºयात वळवून कश्यपी, गंगापूर धरणातूनसिन्नरमार्गे थेट जायकवाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.एकंदरीत एकदरे वळण प्रकल्पावर आगामी काळात स्थानिक जनतेसह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघर्ष समिती यांना आपापल्या स्तरावर काम करण्याची गरज आहे. ( समाप्त )खासदारद्वयींची भूमिका महत्त्वाचीनाशिक जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून, नाशिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे हेमंत गोडसे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण करीत आहेत. एकदरे वळण बंधाºयाचे पाणी आपापल्या मतदारसंघात वळविण्यासाठी दोन्ही खासदारांचे प्रयत्न सुरू राहणार असून, यामध्ये कोण बाजी मारेल याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिमवाहिनी प्रकल्प चर्चेला येणार आहेत. मागील आठवड्यात केंद्रीय जल आयोगाच्या पाहणी पथकाने पेठ तालुक्यातील एकदरे प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाची निर्मिती झाल्यास सदरचे पाणी वाघाड धरणात वळविण्यासाठी आग्रह धरला आहे.