शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुक्या हुंदक्याचे ‘चालणे’ कुणाला कळावे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 2:41 PM

पिंपळगाव बसवंत (गणेश शेवरे) : शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच अनेक जनावरांच्या पायांची खुरे वाढल्याने त्यांना चालतांना वेदनादायी प्रवास करत अन्न-पाणी शोधावे लागत असून, ‘मुक्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळणार’, असा प्रश्न पिंपळगावकरांना पडला आहे.

पिंपळगाव बसवंत (गणेश शेवरे) : शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच अनेक जनावरांच्या पायांची खुरे वाढल्याने त्यांना चालतांना वेदनादायी प्रवास करत अन्न-पाणी शोधावे लागत असून, ‘मुक्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळणार’, असा प्रश्न पिंपळगावकरांना पडला आहे.  शहरातील बस स्थानक व आजूबाजूच्या परिसरात प्रवासी व इतर लोकांची नेहमीच वर्दळ असते. तर काही मोकाट जनावरांचीही गर्दी दिसून येते. त्यातीलच एक लाल-भुरक्या रंगाची गाय अतिशय अवघड स्थितीत जीवन जगत असल्याचे दिसते. अनेक दिवसांपासून या गायीच्या चारही पायांच्या खुरांची असामान्य वाढ झालेली आहे. त्यामुळे तिला चालणे मुश्किल होत आहे. याशिवाय उदरनिर्वाहासाठी चारा शोधताना इतर जनावरांबरोबर स्पर्धा करत तिला वेदनादायी कसरत करावी लागत आहे. या गाईच्या चारही खुरांची झालेली अतिरिक्त वाढ तिच्यासाठी वेदनादायी ठरत आहे. त्यामुळे प्राणिमित्रांकडून तिच्या वाढलेल्या खुरांवर उपचार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, येथील ग्रामपंचायत प्रशासनाचे मोकाट जनावरांकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने प्राण्यांच्या जीवनमरणाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.एखाद्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन या गाईला चालता येईल व चारा मिळविता येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून आळवला जात आहे. तर पशुसंवर्धन विभाग अथवा संबंधित यंत्रणेने मोकाट जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवून त्यांचे जगणे सुलभ करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक