शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

पोलिसांना कोण जुमानतं?

By admin | Updated: August 19, 2014 01:22 IST

गणेशमूर्ती गाळे : शांतता क्षेत्रात असूनही यंत्रणा मख्ख

नाशिक : एरव्ही रस्त्यालगत दुचाकी लावली तरी वाहतुकीला अडथळा आणला म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दंड करणाऱ्या पोलीस यंत्रणेने शांतता क्षेत्रात गणेशमूर्ती गाळे उभारणी सुरू झाल्यानंतर मख्ख भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे, तर ज्या रस्त्यावर गाळे बांधले जात आहेत ती जागा पालिकेची असल्याची सोयिस्कर भूमिका घेत हातही झटकले आहेत. दुसरीकडे पालिकेचे नेहमीचे राजकारण असून, आजी-माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते असलेल्या मूर्ती विक्रेत्यांसमोर पालिका प्रशासनाने सपशेल लोटांगण घातले आहे.गणेशमूर्ती विक्रीचे गाळे थाटण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भिंतीलगत गाळे उभारणीचा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात विक्रेत्यांनी महापौर यतिन वाघ आणि अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी पोलिसांची परवानगी आल्यानंतर परवानगी देण्याचा विचार करू, असे सांगितले होते. परंतु त्याकडेही सोयीची भूमिका ठरली. त्यानंतर अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम अचानक सुटीवर गेले आहेत. पोलिसांनी गाळे उभारण्यास परवानगी न देण्याची भूमिका जाहीर केली असली तरी त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न करताच गाळेधारकांनी सोयीची भूमिका घेतली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात शांतता क्षेत्र म्हणजेच सायलेन्स झोन असून, अशा ठिकाणी मुळातच गाळे उभारता येत नाही. त्यातच हे गाळे थेट रस्त्यावर दुतर्फा उभारले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. साहजिक शांतता क्षेत्र आणि वाहतुकीस अडथळा हे दोन्ही विषय पोलीस यंत्रणेच्या अखत्यारीत आहेत. परंतु एरव्ही सर्वसामान्य नागरिकांची छळवणूक करणारी पोलीस यंत्रणा मख्खपणे हे बघत आहे आणि राजकीय संरक्षण असलेल्या विक्रेत्यांची पाठराखण करीत आहेत. पालिका स्वबळावर हे गाळे हटवू शकत नाही हे ज्ञात असल्यानेच पोलीस यंत्रणा सोयीची भूमिका घेत आहे. (प्रतिनिधी)