टमाटा पिकावर पांढरी माशी

By Admin | Updated: April 19, 2016 00:27 IST2016-04-18T23:28:11+5:302016-04-19T00:27:05+5:30

रोगाचा प्रादुर्भाव : देवळा, कळवण तालुक्यातील शेतकरी संकटात

White fly on tomatoes | टमाटा पिकावर पांढरी माशी

टमाटा पिकावर पांढरी माशी

 खामखेडा : देवळा व कळवण तालुक्यातील उन्हाळी टमाटा पिकावर पांढरी माशी व बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन दुष्काळात मोठ्या प्रमाणावर खर्च करून घेतलेले पीक आर्थिक आधार मिळवून देईल अशी आशा असताना, टमाट्याचे घटलेले बाजारभाव व कीडरोगांचा प्रादुर्भाव अशा दुहेरी संकटाचा सामना उत्पादकांना करावा लागत आहे.
दरम्यान, बुरशीजन्य (तिरंगा) रोग नामवंत कंपनीच्या संकरित टमाटा पिकावरच झाल्याचे दिसून येत आहे. देवळा, कळवण व चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी व पावसाळी हंगामात टमाट्याची लागवड केली जाते. यावर्षी दुष्काळी परिस्थितीत खामखेडासह परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या टमाट्याच्या वाणावर पांढरी माशी व बुरशीजन्य रोग यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. दोन ते अडीच महिन्यांपासून या पिकावर खर्च करून मात्र सध्या या पिकावर झालेल्या या प्रादुर्भावाने शेतकऱ्यास शून्य उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खामखेडा परिसरात यावर्षी चारशे ते पाचशे एकरावर लागवड झाली आहे. त्यापैकी दोन-अडीचशेहून अधिक क्षेत्रावर या वाणाची लागवड झाली आहे. बियाणे, रोपे व रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीड, बुरशीनाशके, तारा, बांबू आदिंच्या विक्र ीतून या दोन्ही तालुक्यात तसेच एकट्या चांदवड तालुक्यात दरवर्षी सुमारे वीस ते पंचवीस कोटी रु पयांची उलाढाल होते. मात्र टमाटा बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची झालेली यावर्षीची फसवणूक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. उत्पादनाची दिशाभूल करणारी माहिती देऊन कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. झालेले नुकसान भरून देण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांचा झालेला खर्च व अपेक्षित उत्पादन भरून देण्याची मागणी खामखेडा येथील उत्पादक शेतकरी प्रभाकर शेवाळे, दत्तात्रय मोरे, मन्साराम शेवाळे, संजय बच्छाव, सुनील मोरे, समाधान अहेर, गोरख शेवाळे, आबाजी शेवाळे, नितीन शेवाळे, अमित निकम, बाळू मोरे, भावडू सूर्यवंशी, बाळू बोरसे, मुकुंद बोरसे, सदाशिव शेवाळे, कारभारी बाबूराव, संजय नथू, नाना पाटील यांसह उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: White fly on tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.