शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

रुग्णसेवेच्या आड मद्यसेवेचा घाट !

By admin | Updated: February 20, 2017 00:10 IST

पोलिसांची करडी नजर : जिल्ह्यात धावताहेत ७१७ रुग्णवाहिका; पाण्याचे टँकरही रडारवर

विजय मोरे : नाशिकरस्ते अपघातातील गंभीर जखमी असो की हृदयविकाराचा झटका आलेला असो या सर्वांसाठी जीवदान ठरते ती रुग्णवाहिका अर्थात अ‍ॅम्ब्युलन्स़ रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी २४ तास धावणाऱ्या या रुग्णवाहिकेचा सायरन ऐकल्यानंतर वाहनधारक तत्काळ आपली वाहने बाजूला घेऊन रस्ता करून देतात़ मात्र रुग्णसेवेचे तसेच लाखोंचे काम करणाऱ्या या रुग्णवाहिकांचा निवडणुकीच्या कालावधीत अवैध कामासाठी वापर केला जात असल्याचे वास्तव इंदिरानगरमधील घटनेनंतर समोर आले आहे़ त्यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागास रुग्णवाहिका तसेच पाण्याचे टँकर यावर आपले लक्ष्य केंद्रित करावे लागणार आहे़  रुग्णांचा जीव वाचविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या रुग्णवाहिकांकडे बघण्याचा केवळ नागरिकांचा नव्हे तर पोलीस खात्याचा दृष्टिकोनही चांगला आहे़ सायरन वाजवत जाणारी रुग्णवाहिका गंभीर रुग्णाला दवाखान्यात घेऊन जात असावी अन्यथा अपघातस्थळी जात असावी असा नागरिकांचा समज बहुतांशी खराही असतो़ मात्र नागरिकांचा हा गैरसमज असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी (दि़१७) सकाळी इंदिरानगर बोगद्याजवळ रुग्णवाहिकेमधून दोन लाखांचा मद्यसाठा जप्त करून सिद्ध केले़  रुग्णवाहिकेकडे बघण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती या वाहनांसाठी निधी देतात़ तसेच पोलीस तसेच सरकारी यंत्रणा याकडे दुर्लक्ष करतात, याचाच गैरफायदा घेऊन सामाजिक निधीतून मिळालेल्या या रुग्णवहिकेमधून मद्याची सर्रास वाहतूक केली जात होती़ विशेष म्हणजे महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला दीव-दमण येथील ८९ हजार रुपयांच्या या मद्याची महाराष्ट्रात दोन लाख रुपये किंमत आहे़ महापालिका निवडणुकीच्या कालावधीत हा मद्यसाठा नेला जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असून, अनेक दिवसांपासून हा उद्योग सुरू असल्याचे समोर आले आहे़ त्यामध्ये रुग्णवाहिका तसेच पाण्याच्या टँकरमधून अवैध मद्याची वाहतूक तसेच मतदारांना वाटण्यासाठी पैसे पाठविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे येत्या काही दिवसांत पोलिसांना रुग्णवाहिका व पाण्याच्या टँकरची विशेष तपासणी करावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)