इगतपुरीत राज्यराणी उभी असतांना रेल्वे रूळाला गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:21 IST2019-07-23T12:20:52+5:302019-07-23T12:21:06+5:30

इगतपुरी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाजवळ सकाळी ७.२०च्या सुमारास मनमाडहुन मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्सप्रेस प्लॅटफार्म नंबर तीनवर आली असता ...

 While standing at Rajghat in Igatpuri, the train went to Rule | इगतपुरीत राज्यराणी उभी असतांना रेल्वे रूळाला गेले तडे

इगतपुरीत राज्यराणी उभी असतांना रेल्वे रूळाला गेले तडे

इगतपुरी : मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाजवळ सकाळी ७.२०च्या सुमारास मनमाडहुन मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्सप्रेस प्लॅटफार्म नंबर तीनवर आली असता रेल्वे रूळाला तडा गेला. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच मुंबईकडे जाणारी मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस व इतर एक्सप्रेस प्लेटफार्म नंबर चार वरु न वळविण्यात आल्या. यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परीणाम झाला नाही. तर राज्यराणी एक्सप्रेस प्लेटफार्म तीनवर अडकली होती. यावेळी आपतकालीन विभागाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन त्यांनी तातडीने रु ळाला तात्पुरता जॉइंड देऊन राज्यराणी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे राज्यराणी एक्सप्रेसला मुंबईला जाण्यासाठी अर्धा ते पाऊणतास उशिर झाला. तडा गेलेला रूळ तातडीने बदली करण्याचे काम हाती घेतले असुन सुमारे दोन तास लागतील अशी माहिती रेल्वे कर्मचा-यांनी दिली.
 

Web Title:  While standing at Rajghat in Igatpuri, the train went to Rule

टॅग्स :Nashikनाशिक