शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काळाची झडप; ओव्हरटेक करताना भाविकांची बस महामार्गावर उलटली, तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 19:49 IST

शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन घेऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे 50 भाविकांना घेऊन मुंबईकडे नाशिकमार्गे जाणारी खासगी बस महामार्गावर घोटी शिवारात उलटली.

नाशिक : शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन घेऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे 50 भाविकांना घेऊन मुंबईकडे नाशिकमार्गे जाणारी खासगी बस महामार्गावर घोटी शिवारात उलटली. बसचालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस दुभाजकावर आदळून उलटली. हा अपघात संध्याकाळी सहा वाजता घडला. या भीषण अपघातात तीन भाविक जागीच ठार तर पंधरपेक्षा अधिक जखमी झाले आहेत.

 नाशिकवरून दुपारी साडे चार वाजता भाविक नाश्ता करून पुढच्या प्रवासाला जात होते. नाशिकवरून सुमारे पंचवीस किलोमीटरवर घोटी अगोदरच पाडळी गावाच्या शिवारात खासगी बस (MH 01 CV9675) वाहनचालकाचा ताबा सुटल्याने उलटली. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू, तर पंधराहुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बसचालक भरधाव वाहन चालवित समोरील वाहनांना ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला असल्याचे बसमधील बचावलेल्या   तरुणांनी सांगितले. चालक सातत्याने ओव्हरटेक करत होता त्यामुळे बस हेलकावे खात होती आम्ही झोपेतून जागे झालो अन बस उलटली असे बसमधील प्रवासी तरुण ऋषीकेश पाठक याने लोकमत शी बोलताना सांगितले.  हा अपघात खूप भीषण होता सुदैवाने आम्ही चौघे विरारचे मित्र बचावलो, असे प्रदीप पाठक याने सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात