शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जेथे परिवहन समिती तेथे बससेवा फक्त तोट्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:28 IST

महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा सुरू करताना त्यासंदर्भातील नियंत्रण लोकप्रतिनिधींना द्यावे यासाठी महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१७) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. महाराष्टत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या परिवहन समितीच्या ताब्यात बससेवा आहेत अशा सर्व ठिकाणी बससेवा तोट्यात असून त्यामुळे परिवहन समिती करण्याची गरज नाही, असे मुंढे यांनी सांगितलेच शिवाय यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असल्याचे सांगितल्याने पदाधिका-यांची निराशा झाली. 

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा सुरू करताना त्यासंदर्भातील नियंत्रण लोकप्रतिनिधींना द्यावे यासाठी महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१७) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली खरी; मात्र महाराष्टत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या परिवहन समितीच्या ताब्यात बससेवा आहेत अशा सर्व ठिकाणी बससेवा तोट्यात असून त्यामुळे परिवहन समिती करण्याची गरज नाही, असे मुंढे यांनी सांगितलेच शिवाय यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असल्याचे सांगितल्याने पदाधिका-यांची निराशा झाली.  दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असून त्यासाठी मंगळवारी (दि.१८) सकाळी पदाधिकारी महाजन यांची मुंबईत भेट घेणार असून तेथेच बससेवेबाबत फैसला होणार आहे.  येत्या बुधवारी (दि.१९) महापालिकेची महासभा असून त्यात शहर बससेवा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र आयुक्तांनी सर्व संचालक ठेकेदार आणि सर्व नियंत्रण आयुक्तांकडे ठेवले असून त्यामुळे भाजपाचे नगरसेवक नाराज आहेत. सोमवारी (दि.१७) रामायण येथे झालेल्या पक्ष बैठकीत यांसदर्भात जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर आधी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करून कोंडी फोडायचे ठरले होते. मात्र आमदार बाळासाहेब सानप यांनी या बैठकीस जाण्यास नकार दिला तर अन्य पक्ष पदाधिकाºयांनी महापालिकेतील प्रमुख पदाधिकाºयांनी आणि ज्येष्ठ नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घ्यावी, असे ठरविले होते. त्यानुसार ही बैठक संपताच पदाधिकारी राजीव गांधी भवनातील महापौरांच्या दालनात गेले. तेथे आयुक्त तुकाराम मुंढे यांना बोलावून घेण्यात आले. यावेळी परिवहन समितीशिवाय शहर बस वाहतूक होऊच शकत नाही. तसेच बससेवेविषयी नागरिकांच्या तक्रारी असतील तर ते लोकप्रतिनिधींकडेच येतील यासह अन्य मते मांडण्यात आली. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यास विरोध दर्शविला. महाराष्ट्रात ज्या ज्याठिकाणी परिवहन समितीमार्फत बससेवा चालविली जाते तेथे तोटाच असल्याचे त्यांनी सप्रमाण मांडले. केवळ नवी मुंबई आणि पुण्याची सेवा कशी चांगली चालते आहे याबाबत आयुक्तांनी माहिती दिली. राज्यात सर्वत्र बससेवा तोट्यातच असल्याचे नगरसेवकांनी सांगितल्यानंतर मुंढे यांनी ही बससेवा नफ्या-तोट्याच्या विषयापेक्षा नागरिकांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे सांगून सर्वांनाच निरुत्तर केले.  मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष नियोजनबद्ध नगर वसविण्यास शेतकºयांचा विरोध असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी पदाधिकाºयांनी केली. मात्र, मखमलाबाद येथे अशाप्रकारचे नगर असावे यासाठी महापालिकेच्या महासभेने ठराव केला आणि त्यानुसार स्मार्ट सिटीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला, त्यामुळे आता हे काम रद्द होणार नाही असेदेखील आयुक्तांनी सांगितल्याने अडचण निर्माण झाली. अखेरीस आयुक्तांशी शांततेत चर्चा झाल्यानंतर आता या विषयाची तड लावण्यासाठी मंगळवारी (दि.१८) मुंबईस जाऊन पालकमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले. गिरीश महाजन यांनी सकाळी पदाधिकाºयांना भेट देण्याचे मान्य केले असून त्यानुसार पदाधिकारी जाणार आहेत.आयुक्तांशी झालेल्या चर्चेत महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेता दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरूस्कर, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, शिवाजी गांगुर्डे, दिनकर आढाव यांच्यासह अन्य काही नगरसेवक उपस्थित होते..विरोधी पक्षांची बैठकमहापालिकेच्या बससेवेसंदर्भात सोमवारी (दि.१७) विरोधी पक्षांची बैठक अजय बोरस्ते यांच्या दालनात पार पडली. यावेळी बससेवेच्या प्रस्तावाबाबत रणनीती ठरविण्यात आली. मात्र ही बाब गोपनीय ठेवण्यात आली आहे. विशेषत: सत्तारूढ भाजपा काय भूमिका घेते यावर बºयाच गोष्टी ठरणार असले तरी बससेवेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गजानन शेलार, शाहू खैरे, गुरुमित बग्गा आणि सलीम शेख आदी उपस्थित होते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर त्यांनी सुमारे पन्नास टक्के करवाढ मागे घेतली असली तरी ती शंभर टक्के मागे घ्यावी यासाठी बैठकीत विषय काढण्यात आला मात्र आयुक्तांनी तो विषयच होऊ शकत नाही असे सांगितल्याने त्यावर अधिक चर्चाच झाली नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे