कुठे रामनामाचा जप, तर कुठे कृष्णभक्ती

By Admin | Updated: August 11, 2015 01:09 IST2015-08-10T23:51:03+5:302015-08-11T01:09:04+5:30

कुठे रामनामाचा जप, तर कुठे कृष्णभक्ती

Where chanting of Ramnama, Where is Krishna Bhakti | कुठे रामनामाचा जप, तर कुठे कृष्णभक्ती

कुठे रामनामाचा जप, तर कुठे कृष्णभक्ती

नाशिक : साधुग्राममध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त विविध आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी अनेक खालशांमध्ये साधू दाखल झाले असून, सकाळी स्नानादी नित्य कर्म आटोपल्यावर कुठे रामनामाचा जप ऐकू येतो, तर कुठे ‘हरे कृष्ण-गोविंद’चा ताल लागलेला दिसतो.
साधुग्राममधील बहुतांश खालशांच्या मंडपाचे काम आता पूर्णत्वास आले असून, साधू-महंतांनी पूजापाठ, नामजप, संकीर्तन, भजन आदि धार्मिक विधी सुरू केले दिसतात. सेक्टर ए मधील नर्मदाखंड खालसा येथील साधू भजनात दंग झालेले दिसतात. तर त्यांच्यालगत आलेल्या श्री पंच तेराभाई त्यागी खालसामध्येदेखील देवपूजा मांडून जप, नामस्मरण, पूजापाठ आदि विधी सुरू आहेत. डाकोर खालसा, परमहंस धाम खालसा, बालाजी धाम खालसा, श्री भक्तमल त्यागी खालसा, श्री महंत गुरू अर्जुनदास खालसा आदि ठिकाणी भजन, सत्संग, प्रवचन आदि धार्मिक विधी सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Where chanting of Ramnama, Where is Krishna Bhakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.