रंगकर्मी, कलाकारांची कोंडी कधी फुटणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:21+5:302021-07-24T04:11:21+5:30
पहिल्या लाटेनंतर शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळून ५० टक्के संख्येत झालेली नाटके देखील हाऊसफुल्ल झाली होती. त्यातूनच नागरिकांना देखील ...

रंगकर्मी, कलाकारांची कोंडी कधी फुटणार ?
पहिल्या लाटेनंतर शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळून ५० टक्के संख्येत झालेली नाटके देखील हाऊसफुल्ल झाली होती. त्यातूनच नागरिकांना देखील रंगभूमी सुरु राहणे अपेक्षित असल्याचेच अधोरेखित झाले होते. मात्र. त्यानंतरच्या काळात त्याच रंगभूमीवर काही अन्य कार्यक्रम अगदी गर्दीत आणि फारशा कोणत्याही निर्बंधांविना पार पडले, ते सर्वांना चालले. मात्र, नाटके, नृत्य, संगीत, ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम सर्व नियम पाळण्याची हमी देऊनही घेऊ दिले जात नाहीत, यामुळे सर्वच कलाकारांमध्ये एक प्रकारची निराशा पसरली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम हे समाजात चैतन्य निर्माण करणारे असताना कलाकारांमध्येच नैराश्याची भावना पसरत चालली आहे. एकूणच सांस्कृतिक क्षेत्राला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे. कालिदास दिनाच्या दिवशी महापौरांनी स्वत: जिल्हाधिकारी आणि शासनाशी बोलण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यातही पुढे काहीच झाले नाही. नाट्य परिषदेचे प्रतिष्ठेचे शिरवाडकर-कानेटकर पुरस्कार दोन वर्षांपासून रखडले आहेत. सर्व रंगकर्मी आणि कलाकार विचित्र कैचीत सापडले आहेत. अगदी सोमवार ते शुक्रवार तेदेखील चारपूर्वी अशा प्रकारच्या परवानग्या मिळाल्या तरी रंगकर्मींना काहीतरी दिलासा मिळू शकेल. रंगभूमीवरच उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्यांची अवस्था तर अत्यंत वाईट असल्याने आतातरी काही तोडगा काढला जायला हवा, अशीच सर्वांची कळकळीची विनंती आहे.
प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा
---------------------------------------
गेस्ट रुमसाठी मुलाखत
फोटो
२३कदम
२३नाट्य परिषद