शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

ओझरला भगदाडमध्ये बिबट्या अडकतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:30 IST

मौजे सााकोरे मिग येथील एचएएल मीगच्या परिसरात असलेल्या संरक्षण भिंतीच्या भगदाडमधून जाण्याच्या प्रयत्नात रविवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास एक प्रौढ बिबट्या अडक ला. भगदाडच्या समोरील बाजूने संरक्षक तारेचे कुंपण असल्यामुळे बिबट्याला बाहेर पडता येत नसल्याने तो सुटकेसाठी झटापट करत होता. घटनेची माहिती मिळताच वनविभाग पूर्वच्या चांदवड, नाशिक पश्चिमच्या रेस्क्यू पथकाने धाव घेत बिबट्याला भुलीचे इंजेक्शन (डार्ट) देत सुटका केली.

ठळक मुद्देवनविभाग पूर्वच्या पथकाकडून सुरक्षित ‘रेस्क्यू’

नाशिक : मौजे सााकोरे मिग येथील एचएएल मीगच्या परिसरात असलेल्या संरक्षण भिंतीच्या भगदाडमधून जाण्याच्या प्रयत्नात रविवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास एक प्रौढ बिबट्या अडक ला. भगदाडच्या समोरील बाजूने संरक्षक तारेचे कुंपण असल्यामुळे बिबट्याला बाहेर पडता येत नसल्याने तो सुटकेसाठी झटापट करत होता. घटनेची माहिती मिळताच वनविभाग पूर्वच्या चांदवड, नाशिक पश्चिमच्या रेस्क्यू पथकाने धाव घेत बिबट्याला भुलीचे इंजेक्शन (डार्ट) देत सुटका केली.ओझर विमानतळ ते एचएएल मीगच्या परिसरात बिबट्यांसह अन्य वन्यजिवांचा वावर आढळतो. या भागात बिबट संचार असून, स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्याचे अधूनमधून दर्शन घडत असते. रविवारी मध्यरात्री भक्ष्याचा पाठलाग करताना पूर्ण वाढ झालेला बिबट्या अचानकपणे एचएएलच्या दगडी संरक्षण भिंतीला असलेल्या भगदाडातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अडकून पडला. कारण भिंतीच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक लोखंडी तारेचे कुंपण होते. त्यामुळे बिबट्याला भगदाडमधून बाहेर पडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे बिबट्या गुरगुरत डरकाळ्या फोडू लागला.बिबट्याच्या आवाजाने आजूबाजूला असलेले भटके श्वान जोरजाराने भुंकू लागले. त्यामुळे शेतकरीदेखील साखरझोपेतून जागे झाले. बिबट्याची डरकाळी कानी पडत होती; मात्र पहाटेच्या अंधारात बिबट्या नजरेस पडत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले. दिवस उगविल्यानंतर बिबट्या काही स्थानिकांच्या नजरेस पडला. त्यानंतर तेथील नागरिकांनी तत्काळ ओझर पोलीस ठाण्यासह वनविभागाला माहिती कळविली. तासाभरात सकाळी ११ वाजेपर्यंत चांदवड, नाशिक पश्चिम कार्यालयाचे पथके घटनास्थळी पोहोचले. वनक्षेत्रपाल संजय पवार, विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, नाना चौधरी, दीपक जगताप, सुनील महाले, अभिजित महाले आदींनी रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले.बिबट्या तार आणि वायरींच्या जाळ्यात पाठीमागून पूर्णपणे अडकलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. एचएएलच्या हद्दीतच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तोरण पवार, डॉ. अल्केश चौधरी यांनी बिबट्यावर उपचार केले.असे राबविले ‘रेस्क्यू आॅपरेशन’बिबट्या सुटकेसाठी प्रचंड आक्रमक झाला होता. त्यामुळे चवताळून त्याच्याकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता त्याला तत्काळ सुरक्षितरीत्या पिंजºयात घेणे गरजेचे होते. वनरक्षक, वन्यजीवप्रेमी संस्थेचे स्वयंसेवकांनी गावकºयांना घटनास्थळापासून लांब केले. घटनास्थळी पोहोचलेल्या वनअधिकाºयांसह पशुवैद्यकीय अधिकाºयांनी बिबट्याला भुलीचे इंजेक्शन (ट्रॅन्क्युलाईज) देण्याचा निर्णय घेतला. यावेळी वनपालांनी ‘ब्लोअरपाईप’च्या सहाय्याने तत्काळ बिबट्याच्या पाठीच्या दिशेने ‘डार्ट’ सोडला. बिबट्याला डार्ट अचूक लागल्याने अवघ्या काही मिनिटांत तो बेशुद्ध पडला. तत्काळ वनकर्मचारी, वनमजूर व वन्यजीवप्रेमींनी धाव घेत बिबट्याच्या शरीराला तार आणि वायरींच्या विळख्यातून मुक्त करत पिंजºयात घेतले.पाठीवर तारेचे ओरखडे लागल्याने जखमाबिबट्याच्या पाठीला तारेचे ओरखडे लागल्याने काही प्रमाणात जखमा झाल्याचे आढळून आले; मात्र जखमा फारशा खोलवर नसल्याने धोका टळला. दुपारी ४ वाजेपर्यंत बिबट्यावर प्राथमिक उपचार पूर्ण करण्यात आले. वन्यजीवप्रेमी संस्था इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी यावेळी वनकर्मचाºयांना ‘रेस्क्यू आॅपरेशन’ उपचाराकामी सहकार्य केले. सायंकाळपर्यंत बिबट्या शुद्धीवरदेखील आल्याचे भदाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या