पंचवटी : वेळ सकाळी ११ वाजता... ठिकाण म्हसरूळ मनपा छत्रपती शिवाजी विद्यालय... विद्यार्थी आणि नागरिकांची आरडाओरड, शाळेच्या इमारतीत अज्ञात कारणाने आग लागण्याची घटना घडली. घटनेनंतर पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शाळेच्या इमारतीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढून शाळेच्या परिसरात लागलेली आग आटोक्यात आणली.मनपा शाळेत आग लागल्याची घटना समजताच नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. समोरचे दृश्य बघून नागरिकांच्या पायाखालची वाळू सरकली. घटनास्थळी आपत्ती निवारण दिन निमित्ताने महापालिका प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून मॉकड्रिल सुरू असल्याचे समजले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पाण्याच्या बंबासह दाखल होऊन पाण्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवितात. आपत्ती निवारण दिनानिमित्त करण्यात आलेल्या एस. जी. कानडे, पी. आर. पगारे, जी. एम. डांगळे, नितीन म्हस्के, आर. आर. खारे, एस. डी. भालेराव, एस. एच. माळी, आर. डी. कदम, जे. आर. झनकर सहभागी झाले होते.तत्काळ उपाययोजनाशहरात कुठेही अपघाताची, आगीची किंवा अन्य काही घटना घडल्यास अग्निशामक दलाकडून कशाप्रकारे आलेल्या आपत्तीवर मात करता येते याचे प्रात्यक्षिक अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविले. येथील महापालिका शाळेत आग लागल्यानंतर सदरची घटना नियंत्रण कक्षाला कळविली जाते. त्यानंतर तत्काळ उपाययोजना केली जाते.
मनपा शाळेस आग लागते तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:11 IST
वेळ सकाळी ११ वाजता... ठिकाण म्हसरूळ मनपा छत्रपती शिवाजी विद्यालय... विद्यार्थी आणि नागरिकांची आरडाओरड, शाळेच्या इमारतीत अज्ञात कारणाने आग लागण्याची घटना घडली. घटनेनंतर पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शाळेच्या इमारतीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढून शाळेच्या परिसरात लागलेली आग आटोक्यात आणली.
मनपा शाळेस आग लागते तेव्हा..
ठळक मुद्देआपत्ती निवारण दिन : अग्निशामक दलाकडून बचाव कार्य