सिडको महाविद्यालयात यम अवतरतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:34 IST2019-12-11T00:33:21+5:302019-12-11T00:34:50+5:30
सकाळी ९.१५ची वेळ... महाविद्यालयामध्ये तासिका सुरू... किरकोळ विद्यार्थी बाहेर फिरत असताना अचानक यमराजाचा गणवेश परिधान केलेली एक व्यक्ती महाविद्यालयाच्या गेटवर येते. दुचाकी चालविताना आवर्जून हेल्मेट वापरा नाहीतर माझी भेट अटळ आहे, असा संदेश देत ते विद्यार्थ्यांशी सहज-संवाद साधतात.

सिडको महाविद्यालयात यम अवतरतात तेव्हा...
सिडको : सकाळी ९.१५ची वेळ... महाविद्यालयामध्ये तासिका सुरू... किरकोळ विद्यार्थी बाहेर फिरत असताना अचानक यमराजाचा गणवेश परिधान केलेली एक व्यक्ती महाविद्यालयाच्या गेटवर येते. दुचाकी चालविताना आवर्जून हेल्मेट वापरा नाहीतर माझी भेट अटळ आहे, असा संदेश देत ते विद्यार्थ्यांशी सहज-संवाद साधतात.
गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइल वापरल्याने राज्यात अडीच हजार जणांनी जीव गमावला. वाहतूक पोलिसांवर अरेरावी करणारे वाढत असून नियम मोडणारे स्वत:चे, इतरांचे व पर्यायाने समाजाचे मोठे नुकसान करत आहेत. आपल्या चुकीमुळे इतरांना जीव गमवावा लागणे हे वाईटच आहे. आज दिवसेंदिवस उपचार महाग होत असताना स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असे प्रबोधन करीत यमाचा वेश परिधान केलेल्या कलावंतांने विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयात आयोजित या उपक्र माला विद्यार्थी व शिक्षक यांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला. संयोजन मराठी विभागप्रमुख डॉ. शंकर बोºहाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राहुल पाटील यांनी केले. कार्यक्र मासाठी प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर, उपप्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, डॉ. मंगला भवर, डॉ. डी. एन. पवार, प्रा. सारिका गांगुर्डे आदी उपस्थित होते.