सिटी सेंटरमध्ये जेव्हा बॉम्ब आढळतो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:22 IST2017-08-13T00:21:29+5:302017-08-13T00:22:00+5:30
नाशिक : वेळ संध्याकाळी सहा वाजेची... पोलीस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी खणखणतो... नाशिकच्या उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती दूरध्वनीवरून समजते... तत्काळ नियंत्रण कक्षामधून वायरलेस कॉल बॉम्ब शोधक-नाशक पथकाला केला जातो...

सिटी सेंटरमध्ये जेव्हा बॉम्ब आढळतो..
नाशिक : वेळ संध्याकाळी सहा वाजेची... पोलीस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी खणखणतो... नाशिकच्या उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती दूरध्वनीवरून समजते... तत्काळ नियंत्रण कक्षामधून वायरलेस कॉल बॉम्ब शोधक-नाशक पथकाला केला जातो... अवघ्या काही मिनिटांत गंगापूर, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी... सवलतीच्या दरात होत असलेल्या विक्रीचा लाभ घेण्यासाठी जमलेल्या नाशिककरांच्या गर्दीवर नियंत्रण... बॉम्ब शोधक-नाशक पथक दाखल होऊन तत्काळ यंत्रणेच्या साहाय्याने बॉम्बसदृश वस्तूची तपासणी सुरू... पॅकबंद खोक्यात स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थ असल्याचे यंत्राकडून संकेत... तत्काळ कर्मचारी सुसज्जपणे संरक्षित सूट परिधान करून उपस्थितांमध्ये भीतीचे सावट... मॉलमध्ये अडकलेल्या ग्राहकांचा बाहेर पडण्यासाठी अट्टाहास... चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पोलिसांनी प्रवेशद्वार रोखले... काही मिनिटांमध्ये सदर कर्मचाºयाकडून बॉम्बच्या वायरी कापून धोका टाळला जातो. उपस्थितांकडून टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. अखेरीस पोलीस अधिकाºयांकडून सदर प्रकार हा एक रंगीत तालीम (मॉकड्रिल)चा भाग होता, असे जाहीर केले जाते आणि सर्वांचा जीव भांड्यात पडतो. कोणीही अफवा पसरवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.