अनकाई रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीची चाके घसरली़

By Admin | Updated: July 17, 2015 00:40 IST2015-07-17T00:40:52+5:302015-07-17T00:40:52+5:30

अनकाई रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीची चाके घसरली़

Wheelchair wheel collapsed near Anakaai railway station | अनकाई रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीची चाके घसरली़

अनकाई रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीची चाके घसरली़

  मनमाड : मनमाड हून बारामती कडे जाणाऱ्या मालगाडीची चाके अतिरीक्त लोड झाल्याने गाडी पुढे न जाता जागच्या जागी फिरू लागल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर मनमाड येथून आलेले अतिरीक्त इंजीन या मालगाडीला जोडून गाडी रवाना करण्यात आली.
बरामती कडे जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावरून निघालेली मालगाडी अनकाई रेल्वे स्थानकाजवळ आली असता तीची गती कमी होउन चाके जागच्या जागी फिरू लागली. या व्हील स्लीप मुळे गाडी पुढे जाणे अशक्य झाले. अचानक निर्माण झालेल्या या तांत्रीक अडचणी मुळे रेल्वे प्रशासनाची धावाधाव झाली. या मार्गावरून इतर गाड्या जाउ न शकल्याने काही काळ रेल्वे वहातुकीला अडथळा निर्माण झाला.अनकाई जवळ चढ असल्याने तसचे पावसाचे थेंब रुळावर पडल्याने सदरचा प्रकार घडला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी मालगाडी ओव्हरलोड असल्याने सदरचा प्रकार घडला असल्याचे बोलले जाते. मनमाड येथून आनलेल्या अतिरीक्त रेल्वे इंजीनच्या सहाय्याने सदरची मालगाडी रवाना करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Wheelchair wheel collapsed near Anakaai railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.