सोमेश्वर मंदिराला दिव्यांग भाविकांसाठी व्हीलचेअर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:11 IST2020-01-25T23:08:05+5:302020-01-26T00:11:58+5:30
दिव्यांग भाविकांना सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी खूप कसरत करावी लागत असल्याने दान फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शर्मा यांनी दिव्यांग भाविकांसाठी दोन व्हीलचेअर नगरसेवक विलास शिंदे यांच्या उपस्थितीत भेट दिल्या.

दिव्यांग भाविकांसाठी व्हीलचेअर भेट देताना नीलेश शर्मा, पराग साळुंके, बाळासाहेब लांबे, गोकुळ पाटील, विलास शिंदे, संतोष गायकवाड, राधा बेंडकुळे, दत्तू पाटील, मुरलीधर पाटील आदी.
गंगापूर : दिव्यांग भाविकांना सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी खूप कसरत करावी लागत असल्याने दान फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शर्मा यांनी दिव्यांग भाविकांसाठी दोन व्हीलचेअर नगरसेवक विलास शिंदे यांच्या उपस्थितीत भेट दिल्या.
गंगापूर रोडवरील अतिप्राचीन महादेवाचे मंदिर असून, याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामध्ये सर्वसाधारण असलेल्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी व चढ-उतार करण्यासाठी काहीच अडचण नसते, मात्र दिव्यांग भाविकांना पार्किंगपासून ते थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे दान फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शर्मा, पराग साळुंके व महिला सदस्यांनी सोमेश्वर महादेव मंदिरा संस्थानला दोन व्हीलचेअर संस्थानचे माजी अध्यक्ष बाळासाहेब लांबे व गोकुळ पाटील यांच्याकडे भेट देण्यात आल्या. यावेळी शिवसेना गटनेते विलास शिंदे, सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड, नगरसेवक राधा बेंडकुळे, मुरलीधर पाटील, दत्तू पाटील, कडलग आदी उपस्थित होते.