महिलांच्या डोक्यावरील हंड्याला लागली चाके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 09:12 PM2021-04-07T21:12:22+5:302021-04-08T00:54:50+5:30

पेठ : नदीच्या पाणी पातळीपासून उंच डोंगरावर वसलेल्या पेठ तालुक्यातील घोटविहिरा येथील महिलांच्या डोक्यावरील हंडयाला आता चाके लागली आहेत. मुंबईच्या अमास सेवा ग्रूप सह सहयोगी संस्थांनी जवळपास ७५ हजार रूपयाचे वॉटर व्हील ड्रम वाटप केल्याने महिलांची पाण्यासाठीची कसरत थांबली आहे.

The wheel hit the pot on the woman's head! | महिलांच्या डोक्यावरील हंड्याला लागली चाके !

घोटविहिरा ता. पेठ येथील महिलांना वॉटरव्हील ड्रमचे वितरण करतांना अमास सेवा ग्रूपचे सदस्य.

Next
ठळक मुद्देघोटविहीरा : वॉटर व्हील ड्रम सामाजिक संस्थाकडून मदत

पेठ : नदीच्या पाणी पातळीपासून उंच डोंगरावर वसलेल्या पेठ तालुक्यातील घोटविहिरा येथील महिलांच्या डोक्यावरील हंडयाला आता चाके लागली आहेत. मुंबईच्या अमास सेवा ग्रूप सह सहयोगी संस्थांनी जवळपास ७५ हजार रूपयाचे वॉटर व्हील ड्रम वाटप केल्याने महिलांची पाण्यासाठीची कसरत थांबली आहे.
ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असतांना महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत असल्याची समस्या लक्षात घेऊन मुंबईच्या अमास सेवा ग्रुप, जय अंबे ग्रुप, रश्मी पारेख, पुष्य सेवा ग्रुप, विले पार्ले, राकेश कोठारी, प्रिती गाला, सेवा समिती ग्रुप आदींच्या आर्थिक सहयोगातून ७५ हजार रूपयाचे ड्रम वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सुभाष चौधरी, नंदराज चौधरी, भागवत चौधरी, गिरीश बोरसे, दिलीप शिंदे, विजय भोये, दिलीप आहिरे, सुरेश सूर्यवंशी, कोकणे, मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Web Title: The wheel hit the pot on the woman's head!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.