वणीच्या टमाट्यांना गुजरातमध्ये मागणी

By Admin | Updated: July 4, 2017 23:41 IST2017-07-04T23:14:28+5:302017-07-04T23:41:50+5:30

वणी : टमाटा व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी कळवण परिसराची निवड केली असून, तेथून टमाटा गुजरात राज्यात जात आहे.

Wheat Tomatoes demand in Gujarat | वणीच्या टमाट्यांना गुजरातमध्ये मागणी

वणीच्या टमाट्यांना गुजरातमध्ये मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : स्थानिक टमाटा उत्पादित होण्यास अवधी असल्याने वणीच्या टमाटा व्यापाऱ्यांनी टमाटा खरेदी करण्यासाठी कळवण परिसराची निवड केली असून, तेथून खरेदी केलेला टमाटा गुजरात राज्यात विक्र ी केला जात आहे.
सध्या कळवण तालुक्यात वणी परिसरातील टमाटा खरेदीदार व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे. टमाट्याचे आकारमान, रंग, दर्जा व्यापाऱ्यांच्या पसंतीला उतरल्याने या भागातील टमाटे खरेदी करण्यास व्यापारी अग्रक्रम देत असल्याची माहिती व्यापारी व निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली. कळवण परिसरातून प्रतिदिन सुमारे १५ हजार जाळ्या गुजरातमध्ये विक्रीसाठी जात
आहेत. गुजरातमध्ये स्थानिक उत्पादनासाठी अवधी आहे. तसेच गुजरातमध्ये दर्जेदार वस्तूला खरेदीसाठी अग्रक्रम देण्याची मानसिकता असल्याने ४० रुपये प्रतिकिलो दराने म्हणजेच २० किलोच्या जाळीला ८०० रु पये असा भाव मिळत असल्याने प्रतवारी व दर्जाचा समन्वय साधणाऱ्या उत्पादक व खरेदीदार यांच्यातील आर्थिक उलाढाल गतिमान झाली आहे.

Web Title: Wheat Tomatoes demand in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.