त्र्यंबक तालुक्यात १५५ हेक्टरवर गव्हाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:25 PM2019-12-06T18:25:36+5:302019-12-06T18:27:07+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत १५५ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे, तर ६३ ते ६५ हेक्टर क्षेत्रात हरबऱ्याची पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.

Wheat sowing on 3 hectares in Trimbak taluka | त्र्यंबक तालुक्यात १५५ हेक्टरवर गव्हाची पेरणी

त्र्यंबक तालुक्यात १५५ हेक्टरवर गव्हाची पेरणी

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात आतापर्यंत १५५ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे, तर ६३ ते ६५ हेक्टर क्षेत्रात हरबऱ्याची पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली. तालुक्यात २३४०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, रब्बी क्षेत्र केवळ ११०० हेक्टर इतकेच आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खरीप पिके मोठ्या प्रमाणात होत असतात. येथील मुख्य पीक भात, नागली, वरई, खुरसणी, उडीद आदी पिके घेतली जातात. तालुक्याची पावसाची सरासरी २२५० मिमी असून, यावर्षी तर पावसाने सरासरी ओलांडून साधारण ४४०० मिमी. पाऊस पडला आणि त्यामुळेच रब्बी पिकांची पेरणी कमी आहे. जेथे गहू, हरबरा करतात त्या शेतात अजूनही पाणी असल्याने रब्बीची पेरणी होऊ शकत नाही. हे पाणी आटल्यावरच गहू, हरबरा पेरता येईल.

Web Title: Wheat sowing on 3 hectares in Trimbak taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.