हाऊ इज द जोश : कहा था ना, ये नया हिंदुस्तान हैं; घर में घुसेगा भी... और मारेगा भी...

By अझहर शेख | Updated: February 26, 2019 18:06 IST2019-02-26T17:55:36+5:302019-02-26T18:06:54+5:30

मंगळवारी (दि.२६) सकाळी माध्यमांमधून पाकला भारताच्या वायुसेनेने दिलेल्या चोख प्रत्युत्तराची बातमी येताच सोशलमिडीयावर सकाळपासूनच #एअरस्ट्राईक, #बालाकोट, #भारतीय वायुसेना, #जोश, #सर्जिकलस्ट्राईक-२ अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडदेखील सुरू झाल्याचे पहावयास मिळाले.

Whatsapp Message On Indian Air Strike Also known As Surgicalstrike 2.0 | हाऊ इज द जोश : कहा था ना, ये नया हिंदुस्तान हैं; घर में घुसेगा भी... और मारेगा भी...

हाऊ इज द जोश : कहा था ना, ये नया हिंदुस्तान हैं; घर में घुसेगा भी... और मारेगा भी...

ठळक मुद्देसोशलमिडियावर एकच चर्चा ती म्हणजे ‘हाऊ इज द जोश’.भारतीय वायुसेनेला धन्यवाद देत अभिनंदन

नाशिक : भारतीय वायुदलाने ‘मिराज-२०००’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून दहशतवाद्यांचे ‘लॉन्चींग पॅड’ उद्ध्वस्त करत पुलवामा हल्ल्याचा १३व्या दिवशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकविला. या कारवाईनंतर अवघ्या देशभरात जल्लोष साजरा होऊ लागला. १३दिवसांपासून गहिवरलेल्या सोशलमिडियाही मग याला अपवाद राहिला नाही.

नेटिझन्सकडून भारतीय वायुदलाचे मंगळवारी (दि.२६) सकाळी माध्यमांमधून पाकला भारताच्या वायुसेनेने दिलेल्या चोख प्रत्युत्तराची बातमी येताच सोशलमिडीयावर सकाळपासूनच #एअरस्ट्राईक, #बालाकोट, #भारतीय वायुसेना, #जोश, #सर्जिकलस्ट्राईक-२ अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडदेखील सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत सीमापार जाऊन मिराज या लढाऊ विमानांच्या सहाय्याने बॉम्बवर्षाव करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले.२१ मिनिटांच्या या कारवाईत भारतीय वायुसेनेने शेकडो दहशतवाद्यांना कं ठस्नान घातले. सोशलमिडियावर एकच चर्चा ऐकू येऊ लागली ती म्हणजे ‘हाऊ इज द जोश’.
‘‘हाउज द जैश? बॉम्बेड सर..’ #इंडियन एअरफोर्स...’’
भारतीय सेना पापी पाकिस्तानला....क्यु हिला डाला ना...
हाउज द जोश...हाय सर..हाउज द जैश... डेड सर..
आफ्टर इंडियन एअरफोर्स अ‍ॅक्शन, इम्रान खान, पीटीआय इज फॉल इन लो-बी.पी
ये नया हिंदुस्तान हैं.. घर में घुसेगा भी... और मारेगा भी...
बाप, आखीर बाप होता हैं...अशा एकापेक्षा एक वाक्यांसह विविध प्रकारचे विनोदी छायाचित्रांच्या पोस्ट दिवसभर समाजमाध्यमांमधून फिरत होत्या.
तसेच व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक या समाजमाध्यमांमध्येदेखील विविध प्रकारच्या पोस्ट या कारवाईनंतर सुरू झाल्या होत्या. अनेकांनी आपले स्टेटस्, प्रोफाईलद्वारे विविध प्रकारचे पोस्ट ठेवून भारतीय वायुसेनेला धन्यवाद देत अभिनंदन केले.

त्यामधील काही निवडक पोस्ट अशा...
‘‘हम हिंदुस्तानी हैं १२दिनो तक शोक रखते हैं, १३वे दिन काम पर लग जाते हैं... जय हिंद!!
आमचा पॅटर्नच वेगळा आहे... आम्ही तोडत नाही डायरेक्ट फोडतो..भारतीय वायु सेना
४०चा बदल्यात ४०० घेतले, भारतीय वायुसेनेचे हार्दिक अभिनंदन...!
हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान हैं...घर में घुसेगा भी और मारेगा भी...
आज राजकुमार का फेमस डायलॉग याद आ रहा हैं...
हम तुम्हे मारेगे, और जरूर मारेंगे, लेकिन बंदुक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा, बस जमीन तुम्हारी होगी..

Web Title: Whatsapp Message On Indian Air Strike Also known As Surgicalstrike 2.0