शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पारावर एकच विषय ग्रामपंचायतनिवडणुकीचा एक्झिट पोल काय ?...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 5:45 PM

पिंपळगाव बसवंत : कोणतीही निवडणूक असली की वाहिन्यांचे प्रतिनिधी तज्ज्ञांना सोबत घेत विजय-पराजयाचा अंदाज बांधतात. निवडणूक संपली रे संपली की एक्झिट पोलच्या आकड्यांवर चर्चा झडत असते. ग्रामपंचायत निवडणुकीत तसे होण्याची सुतराम शक्यता नसली तरी गावागावांतील पारावर, चहा टपरी, सलून दुकाने आणि सोशल मीडियाच्या वॉलवरून गावगुंडी खेळणाऱ्या धुरिणांनी निवडणूक वार्तापत्र सुरू केले आहे. अंदाज अपना अपना अशा पद्धतीने हा एक्झिट पोल सुरू आहे

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : जेवणाच्या अन‌् पैशांच्या लागल्या पैजा

पिंपळगाव बसवंत : कोणतीही निवडणूक असली की वाहिन्यांचे प्रतिनिधी तज्ज्ञांना सोबत घेत विजय-पराजयाचा अंदाज बांधतात. निवडणूक संपली रे संपली की एक्झिट पोलच्या आकड्यांवर चर्चा झडत असते. ग्रामपंचायत निवडणुकीत तसे होण्याची सुतराम शक्यता नसली तरी गावागावांतील पारावर, चहा टपरी, सलून दुकाने आणि सोशल मीडियाच्या वॉलवरून गावगुंडी खेळणाऱ्या धुरिणांनी निवडणूक वार्तापत्र सुरू केले आहे. अंदाज अपना अपना अशा पद्धतीने हा एक्झिट पोल सुरू आहेग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी समोर ठेवून तालुक्यात 'अंदाज अपना अपना'सुरु झाला आहे. कमी-जास्त मतदानानुसार आकडेमोड करीत कार्यकर्ते एक्झीटपोल व्यक्त करीत आहेत. अंदाजातून पैजाही लागत आहेत.प्रभाग आणि मतदान खोलीनुसार मतदानाचे आकडे समोर आल्यानंतर आता कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे.गल्ली, रस्ता व वस्तीवरील झालेले मतदान पाहता लगेचच विजयाचे आराखडे सुरू झाले आहे. रोख रकमेसह जेवणाच्या पार्टीवर पैजा सुरू झाल्या आहेत. सोमवार (दि.१८) पर्यंत हा अंदाजपंचे कार्यक्रम करमणुकीचा विषय ठरत आहे. एवढे मात्र खरे.चार गावांत पती- पत्नी ने आजमावले नशीब ......सरपंच पदाचे आरक्षण महिलां निघाले तर सोय म्हणून अथवा स्वतः पराभूत झालो तर आणि पत्नी निवडून आली तर झेरॉक्स गावकारभारी म्हणून मिरवता येईल म्हणून अवघे कुटुंबच राजकारणांत रंगलेले दिसले. शिरवाडे वणी येथे शरद काळे त्यांच्या पत्नी अश्विनी काळे तेथेच अशोक निफाडे व पत्नी वंदना निफाडे, मुखेड येथे अमोल जाधव व पत्नी मंजुषा जाधव, कारसुळला देवेंद्र काजळे व पत्नी स्वाती काजळे, तर वडाळी नजिक येथे सुभाष होळकर पत्नी सीमा होळकर आदी रिंगणात होते. त्यामुळे पारावरच्या चर्चेत या जोड्याची चर्चा जास्तच रंगली असल्याने मात्र या घरातील जोडप्यांना ग्रामपंचायत कारभार करण्यासाठी मतदारांनी कौल दिला आहे की, नाही याबाबत उत्सुकता लागली आहे.पिंपळगाव हद्दीतील १४ गावांच्या झालेल्या निवडणुकीत शिरवाडे वणी ८८ टक्के, नांदूर कुर्द८८.९३, उंबरखेड ८५, बेहड ८०, आहेरगाव ८३, शिरसगाव ८५.१३, वडाळी नजीक ८९.७५, कारसुळ ८८.६६, रानवड ८३ तर मुखेड ९४.२०, वावी ठशी ९१.४४, सावरगाव ९१.४९, अंतरवेली ९२.२५ आणि रेडगाव ९४ या लहान गावातील मतदानाने नव्वदी ओलांडली आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत