मनपात ठेकेदारीमागील गौडबंगाल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:22 IST2018-01-15T00:14:38+5:302018-01-15T00:22:57+5:30
नाशिक : शहर स्वच्छतेचे काम निरंतर चालणारी प्रक्रिया असतानादेखील महापालिका सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंग म्हणजेच ठेकेदारी पद्धतीने काम देण्याचे का घाटत आहे, या ठेकेदारीमागील गौडबंगाल काय असा प्रश्न अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने करण्यात आला आहे.

मनपात ठेकेदारीमागील गौडबंगाल काय?
नाशिक : शहर स्वच्छतेचे काम निरंतर चालणारी प्रक्रिया असतानादेखील महापालिका सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंग म्हणजेच ठेकेदारी पद्धतीने काम देण्याचे का घाटत आहे, या ठेकेदारीमागील गौडबंगाल काय असा प्रश्न अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात संघटनेने महापौरांना निवेदन दिले आहे. शहरात स्वच्छतेची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने स्वच्छतेच्या कामाचे आउटसोर्सिंग करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
अशाप्रकारचे प्रस्ताव यापूर्वीदेखील आले असल्याने युवकांना बेरोजगारी आणि ठेकेदारीच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.