अझहर शेख, नाशिक : जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरूवात झाली की दरवर्षी पावसाळ्यात‘क्युसेक’, मिमी, टीएमसी, एमसीएफटी असे शब्द वाचायला किंवा ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळही उडतो तर काहींना त्याचे कुतुहलही वाटते. खरे तर हे गणितामधील पाऊसपाणी मोजण्याचे परिमाण (संज्ञा) आहे आणि सामान्यज्ञान सुध्दा. मात्र या शब्दांचा दैनंदिन जीवनात फारसा संबंध येत नसल्यामुळे त्यांचा अर्थ अनेकदा विस्मरणात जातो. जाणून घेऊया, नेमके पावसाचे हे गणित असते तरी कसे...
धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये मोजला जातो.
पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये (मिमी) मोजला जातो
धरणातील पाण्याचा विसर्ग क्युसेकमध्ये मोजला जातो.
२५.४ मि.मी : १ इंच१ घनफूट म्हणजे २८.३१७ लिटर्स पाणी१ एमसीएफटी : १ दशलक्ष घनफूट (१० लाख घनफूट पाणी)१ टीएमसी पाणी = १,००० दशलक्ष घनफूट (१ अब्ज घनफूट पाणी)१ घनफूट प्रति सेकंद म्हणजे १ क्युब प्रति सेकंद असा होतो.१ घनफूट पाणी म्हणजे २८.३१७ लिटर्स पाणी होय.