तिघाडी सरकारचं करायचं काय...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:55+5:302021-09-21T04:16:55+5:30
नाशिक : कोल्हापूरच्या दिशेने निघालेले भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी स्थानबद्ध करत रोखल्याच्या कारवाईचे नाशिकात पडसाद ...

तिघाडी सरकारचं करायचं काय...?
नाशिक : कोल्हापूरच्या दिशेने निघालेले भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी स्थानबद्ध करत रोखल्याच्या कारवाईचे नाशिकात पडसाद उमटले. पोलिसांनी सोमय्यांवर कारवाई केल्यानंतर सोमवारी (दि. २०) दुपारी भाजपतर्फे वसंत स्मृती कार्यालयासमोर घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी ‘तिघाडी सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणा देत राज्य सरकार लोकशाहीची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप केला.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गत आठवड्यात महाविकास आघाडी सरकारचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. त्यानंतर सोमय्या हे सोमवारी कोल्हापूरकडे जात होते. मात्र, कराड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुढे जाण्यापासून रोखले. त्याच्या निषेधार्थ आंदोलन कार्यकर्त्यांनी हातात काळे फलक घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, महेश हिरे, हरिभाऊ लोणारी, रोहिणी नायडू, पवन भगूरकर, प्रशांत जाधव, गणेश कांबळे, अरुण शेदुर्णीकर, राकेश पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
200921\20nsk_45_20092021_13.jpg
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील कथीत दडपशाहीच्या विरोधात नाशिक भाजपाच्या वतीने निदर्शने करताना गणेश कांबळे,गिरीश पालवे, महेश हिरे, हरिभाऊ लोणारी, रोहिणी नायडू, पवन भगूरकर, प्रशांत जाधव, गणेश कांबळे, अरुण शेदुर्णीकर, राकेश पाटील आदी.