निवेदन देण्यास गेले आणि गुन्हेगार ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:34+5:302021-02-05T05:40:34+5:30
या संदर्भात कराची स्टोअर्सच्या मालकांना मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराची हे नाव पाकिस्तानातील शहराचे आहे. पाकिस्तान नेहमीच ...

निवेदन देण्यास गेले आणि गुन्हेगार ठरले
या संदर्भात कराची स्टोअर्सच्या मालकांना मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराची हे नाव पाकिस्तानातील शहराचे आहे. पाकिस्तान नेहमीच भारतात दहशतवादी कृत्ये करत आला आहे. त्यामुळे अनेक निर्दोषांचे जीव गेले आहेत. सीमेवर अनेक सैनिक देश रक्षणासाठी शहीद झाले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा उदोउदो खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे कराची हे नाव दुकानाच्या नावातून वगळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मनसेचे विभाग अध्यक्ष विक्रम कदम, कामगार सेना सरचिटणीस प्रकाश कोरडे, प्रमोद साखरे, विनायक पगारे, नितीन पंडित, रवी कडजेकर, शशिकांत चौधरी, उमेश भोई, नितीन धानापुने, सोनू नागरे, आदित्य कुलकर्णी, मयूर रत्नपारखे, पंकज सोनवणे, चेतन माळवे आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, कराची स्टोअर्स दुकान चालकाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कराची हे नाव बदलण्याबाबत निवेदन देताना पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पदाधिकारी विक्रम कदम, प्रकाश कोरडे, प्रमोद साखरे व इतर दहा ते पंधरा जणांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.