विंचूरदळवी येथे विहीर ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:35 IST2019-09-05T14:34:36+5:302019-09-05T14:35:06+5:30

विंचूरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी परिसरातील भावदेववाडी रस्त्यालगत शेळके यांच्या वस्तीवर वीट बांधकाम असलेली ढासळण्याचा प्रकार घडला आहे.

 The well falls at VincurDalvi | विंचूरदळवी येथे विहीर ढासळली

विंचूरदळवी येथे विहीर ढासळली

विंचूरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी परिसरातील भावदेववाडी रस्त्यालगत शेळके यांच्या वस्तीवर वीट बांधकाम असलेली विहीर ढासळण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विंचुरी दळवी येथील शेतकरी सूर्यभान बहिरू शेळके यांच्या शेतातील गट नंबर ३३१ मध्ये १० परस खोलीची विहीर आहे. या विहिरीच्या भोवती परस खालीपर्यंत वीटाचे बांधकाम करण्यात आले होते. अचानक विहीर पूर्णपणे ढासळून गेली. त्यामुळे संपूर्ण विटांचा व मातीचा मलबा विहिरीत कोसळला त्यामुळे अंदाजे ४ परस विहीर बुजून गेली आहे. विहिरीतील चालू असलेली मोटार, पाइप, केबल पूर्णपणे मलब्याखाली दबले गेले आहे. त्यामुळे विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण शेतीला पाणी पोहचवण्याचे काम या विहिरीमार्फत होत होते. त्यात सध्या पावसाने दडी दिल्यामुळे पिकांना पाण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्यात अशी घटना घडल्यामुळे विहिरीच्या मालकास मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Web Title:  The well falls at VincurDalvi

टॅग्स :Nashikनाशिक