शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

"बरे झाले, ह्यझारीतील शुक्राचार्य समोर आले!"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2022 00:12 IST

मिलिंद कुलकर्णी  मंत्र, यंत्र व तंत्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पडलेल्या धाडी आणि सापडलेली मोठी ...

ठळक मुद्देआरोग्य, आदिवासी विकास, सहकार विभागातील अनागोंदी उघड; लाभार्थी वाऱ्यावरविधिमंडळातही गाजला कांदे-भुजबळ वादराज ठाकरेंचे आता नाशिककडे लक्षशिंदे सेनेचे सुकाणू कुणाच्या हाती?कॉंग्रेसजन अखेर उतरले रस्त्यावरमविप्र निवडणुकीत लोकसभेची चाचपणी

मिलिंद कुलकर्णी मंत्र, यंत्र व तंत्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पडलेल्या धाडी आणि सापडलेली मोठी अपसंपदा धक्कादायक आहेच; पण नाशिकच्या प्रतिमेला ठेच पोहोचविणारी आहे. सामान्य माणसाच्या करातून जमा होणारा निधी सार्वजनिक कामे, समाजातील उपेक्षित घटक यांच्या विकासासाठी वापरला जातो. पण हा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे या कारवायांवरून पुन्हा एकदा समोर आले. आरोग्य विभागातील अधिकारी त्याच विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याचे रजा रोखीकरणाचे काम करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून पकडला जातो. आदिवासी वसतिगृहात मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्याचे कंत्राट मिळालेल्या ठेकेदाराकडून अभियंता २८ लाखांची लाच मागितल्याच्या आरोपावरून पकडला जातो. त्याच्या निवासस्थानी दीड कोटींची रोकड सापडते. वसाकावर आयकर विभागाची धाड पडते. भ्रष्टाचाराची कीड सगळी व्यवस्था कशी पोखरते आहे, हे अशा घटनांमधून ठळकपणे स्पष्ट झाले. त्यामुळेच शासकीय कामे गुणवत्तापूर्ण होत नाही. निकृष्ट कामांचा त्रास सामान्यांना होतो.विधिमंडळातही गाजला कांदे-भुजबळ वादसरकार बदलले की, समीकरणे बदलतात. महाविकास आघाडी सरकार गेले आणि शिंदेसेना व भाजपचे सरकार आले. पूर्वी पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्याविरुद्ध निधीवाटपावरून संघर्ष करणाऱ्या नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी आता थेट विधिमंडळात आवाज उठविला. भुजबळ यांच्या क्लीन चिटला राज्य सरकारने आव्हान का दिले नाही, अशी विचारणा त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशीदेखील त्यांचा याविषयावरून वाद झाला. या घडामोडींवरून भुजबळ-कांदे वाद हा पुढे आणखी चिघळेल, असे चित्र दिसत आहे. आघाडीकडून ह्यखोक्यांह्णचे आरोप जसे वाढतील, तसे आघाडीच्या नेत्यांविरुद्धची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी शिंदेसेना आक्रमक पवित्रा घे्ईल, अशी रणनीती दिसते आहे. त्याचे पडसाद स्वाभाविकपणे स्थानिक पातळीवर उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यातूनच टोल नाक्यावर आंदोलनाची टूम निघाली, ती शिंदेसेनेच्या लोकप्रतिनिधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. हा संघर्ष आणखी किती वळणे घेतो, हे बघायचे.राज ठाकरेंचे आता नाशिककडे लक्षशिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नवा पक्ष काढलेल्या राज ठाकरे यांच्यावर नाशिककरांनी विश्वास दाखवत महापालिकेची सत्ता बहाल केली होती. आमदारदेखील निवडून दिले. त्यामुळे राज आणि नाशिककर यांच्यात वेगळे नाते निर्माण झाले आहे. मुंबई, ठाणे, पुण्यानंतर राज हे नाशिकवर लक्ष केंद्रित करीत आहेत. मध्यंतरी संदीप देशपांडे, प्रकाश महाजन या साथीदारांना त्यांनी नाशिकला पाठविले. अमित ठाकरे हे चार दिवस येऊन गेले. संघटनेची पुनर्बांधणी करीत असताना युवकांवर अधिक भर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज यांची शस्त्रक्रिया आणि महाराष्ट्रातील सत्ताबदल एकाचवेळी घडले. त्यापूर्वी मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा या विषयावर राज आणि मनसे पुन्हा एकदा राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. मात्र, सत्तांतरानंतर समीकरण बदलले. भाजप आणि मनसेची युती होईल, असे चित्र निर्माण झाले असताना एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपला सत्तेत वाटा मिळाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठी माणूस, हिंदुत्व हे विषय हिरिरीने मांडणारी शिंदे सेना वाटेकरी झाली.शिंदे सेनेचे सुकाणू कुणाच्या हाती?शिवसेनेतील बंडानंतर खासदार हेमंत गोडसे, आमदार दादा भुसे, सुहास कांदे हे तिन्ही लोकप्रतिनिधी शिंदे सेनेत गेल्याने मूळ शिवसेनेत लोकप्रतिनिधी कोणीही उरलेले नाही. त्यात कांदे हे जिल्हाप्रमुख होते. बंडानंतर त्यांचे पद काढून घेण्यात आले. शिवसेनेने खांदेपालट करीत निष्ठावंतांना पुन्हा पदे बहाल केली; परंतु दोन महिन्यांनंतरही शिंदे सेनेत अद्याप पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. तिन्ही लोकप्रतिनिधींचे मतदारसंघात वलय आहे, कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, विस्ताराच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीची गरज प्रत्येक राजकीय पक्षाला असते. तशी ती शिंदे सेनेलाही आहेच. इतर जिल्ह्यात पदाधिकारी निवड केली जात असली तरी नाशिकमध्ये शांतता आहे. दादा भुसे यांना मंत्रिपद देण्यात आले. कांदे यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली जाते की, एखादा आणखी सक्षम नेता शोधून त्याच्याकडे जबाबदारी देण्याची रणनीती आखली जाते, याविषयी उत्सुकता आहे. जशा निवडणुका जवळ येतील, तशी शिंदे सेनेत आवक वाढेल, अशीही चर्चा आहे.कॉंग्रेसजन अखेर उतरले रस्त्यावरकॉंग्रेसमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत गोंधळ, संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, याविषयी दिल्लीत जसा गोंधळ सुरू आहे, तसाच गोंधळ नाशिकात शहराध्यक्ष कोण असावे, यावरून सुरू आहे. चिंतन शिबिरात ठरलेले सूत्रदेखील अमलात आले नाही. दोनदा प्रदेश निरीक्षक येऊन गेले; पण अद्याप निर्णय झालेला नाही. आता निवडणुकाच महिनाभर पुढे ढकलल्या जाण्याची चर्चा असल्याने हा विषय पुन्हा लांबणीवर पडणार आहे. दिल्लीवरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे कार्य कॉंग्रेसजन प्रामाणिकपणे करीत आहेत. महागाईविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आदेश आले, त्याचे तंतोतंत पालन झाले. ह्यमहागाईपे चर्चाह्ण झाली. मोजके कार्यकर्ते आणि मोजके लोक असे त्याचे स्वरूप होते. आता भारत जोडो यात्रा सुरू होत आहे. त्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात येऊन गेले. त्यांनी नवा शहराध्यक्ष आठवडाभरात नियुक्त होईल, अशी ग्वाही दिली. पण महिना उलटला, प्रतीक्षा कायम आहे. कुणी पद घ्यायला तयार नाही, असे तर नाही ना?मविप्र निवडणुकीत लोकसभेची चाचपणीमविप्र निवडणुकीच्या माध्यमातून काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची चाचपणी चालविली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. परिवर्तन पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. आमदारकीची जागा कन्या सिमंतिनीसाठी सोडून दिल्लीला जाण्याचे त्यांचे प्रयत्न आहे. अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये माजी खासदार समीर भुजबळ हे त्यांचे स्पर्धक आहेत. हेमंत गोडसे हे शिंदेसेनेत गेल्याने भाजप-शिंदेसेनेत त्यांचे तिकीट निश्चित मानले जात असले तरी भाजपचे चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर तसेच नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनाही लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दोघांचे भाऊ मविप्र निवडणुकीत प्रगती पॅनलचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही चाचपणी सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांचीही लोकसभा निवडणूक लढविण्याची प्रबळ इच्छा आहे. पक्षांतर्गत स्पर्धा जोरदार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग