छगन भुजबळ यांचे इगतपुरीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:16 IST2018-06-14T14:16:13+5:302018-06-14T14:16:13+5:30
इगतपुरी : माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांचे तब्बल अडीच वर्षानतंर प्रथमच नाशिक जिल्हयाचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरीत महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

छगन भुजबळ यांचे इगतपुरीत स्वागत
इगतपुरी : माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांचे तब्बल अडीच वर्षानतंर प्रथमच नाशिक जिल्हयाचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरीत महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादीच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांची कारागृहातुन सुटका झाल्यावर ते नाशिक जिल्हयात कधी येतील याची उत्सुकता कार्यकर्ते यांच्यात होती. आज सकाळपासुनच इगतपुरी शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गवर स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. भुजबळांचे आगमण होताच फटाक्यांची आतीषबाजी व ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्प गोरख बोडके, शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव, माजी उपसभापती पांडुरंग वारूंगसे, प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, सुनील वाजे, तानाजी आव्हाड, वसंत भोसले, राष्ट्रवादीचे घोटी संपर्कप्रमुख किरण मुसळे, हितेश वाजे, माजी नगरसेवक यशवंत दळवी, समता परीषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, हिरामण कवटे, किरण मुसळे, अक्षय दळवी, राजेंद्र घुगे, सिध्दार्थ भामरे, शरद वायदंडे, संदीप दगडे, मनोज दळवी, बाबू दोंदे, विलास जगताप, योगेश जाधव यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.