दिंडोरी तालुका शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:34 IST2019-06-23T18:33:20+5:302019-06-23T18:34:24+5:30

दिंडोरी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यानिमित्त जानोरी येथील विमानतळावर रविवारी (दि.२३) दुपारी तीन वाजता आगमन झाले. यावेळी दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

Welcome to Uddhav Thackeray by Dindori Taluka Shivsena | दिंडोरी तालुका शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांचे स्वागत

दिंडोरी तालुका शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांचे स्वागत

ठळक मुद्देनांदगाव येथे मेळाव्यासाठी ते रवाना होण्यापूर्वी नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिरा आगमन झाले.

दिंडोरी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हा दौऱ्यानिमित्त जानोरी येथील विमानतळावर रविवारी (दि.२३) दुपारी तीन वाजता आगमन झाले. यावेळी दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
नांदगाव येथे मेळाव्यासाठी ते रवाना होण्यापूर्वी नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिरा आगमन झाले. दिंडोरी तालुक्यातील कार्यकर्ते दुपारी बारा वाजल्यापासून विमानतळाच्या गेटवर थांबून होते. दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर नाशिक जिल्हा प्रमुख सुनील पाटील तालुका प्रमुख सतीश देशमुख, सुरेश डोखळे, पेठ तालुकाप्रमुख भास्कर गावित, पांडुरंग गणोरे यांनी स्वागत केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अभिवादन केले. त्यानंतर पुढे नांदगाव दौºयासाठी रवाना झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी होते.
यावेळी दिंडोरी तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते, सर्व विद्यमान जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आदींसह उत्तम जाधव, अरुण वाळके, जयराम डोखळे, सदाशिव गावित, सुनील मुरकुटे, वैभव पाटील, निखील जाधव, गोविंद घुमरे, शंकर चारोस्कर, रावसाहेब जाधव, सुनील मातेरे, गणेश जाधव, तुकाराम जोंधळे, कैलास गणोरे, बाळासाहेब वाघ, आदींसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

(फोटो २३ दिंडोरी)

Web Title: Welcome to Uddhav Thackeray by Dindori Taluka Shivsena