सातपूरला ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:11+5:302021-02-05T05:41:11+5:30
कोरोनाचे सर्व नियम काटेकोर पाळून ज्ञानदानास बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. कोरोनामुळे शाळा बंद परंतु ऑनलाइन शिक्षण चालू होते. शासनाच्या ...

सातपूरला ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
कोरोनाचे सर्व नियम काटेकोर पाळून ज्ञानदानास बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. कोरोनामुळे शाळा बंद परंतु ऑनलाइन शिक्षण चालू होते. शासनाच्या आदेशानुसार बुधवारपासून सर्व नियम पाळून सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शालेय कामकाजास सुरुवात झाली. तत्पूर्वी प्रत्येक वर्ग आणि परिसर सॅनिटायझरने फवारणी करुन घेण्यात आली. सकाळी मुख्याध्यापक सुदाम दाणे आणि सहकारी शिक्षकांनी वर्गात रांगोळ्या काढल्या. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावर ढोलताशांच्या गजरात गुलाबपुष्प देऊन शिक्षकांनी स्वागत केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पालकांचे संमतीपत्र व तपमानाची नोंद घेण्यात आली. एका बेंचवर एक विद्यार्थी अशी व्यवस्था करुन इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांचे अध्यापन सुरु करण्यात आले.
चौकट===
विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
दहा महिन्यानंतर शाळा सुरु झाली असली तरी सातपूर कॉलनीतील महानगरपालिकेच्या (हिंदी) शाळा क्रमांक २७ मधील विद्यार्थ्यांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. पाचवी ते आठवीच्या वर्गांची पटसंख्या २७४ असून केवळ ६० विद्यार्थी फक्त शाळेत आलेत. तत्पूर्वी केंद्रप्रमुख नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी वर्गांची व परिसराची सॅनिटायझर फवारणी करुन घेतली. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सध्यातरी फक्त तीनच तास अध्यापन ठेवण्यात आले आहे.