संत गाडगे बाबा स्वच्छता पालखी रथाचे नाशिकमध्ये स्वागत
By Admin | Updated: October 21, 2016 02:40 IST2016-10-21T02:39:47+5:302016-10-21T02:40:09+5:30
परिभ्रमण : अमरावतीपासून मोहिमेला सुरुवात

संत गाडगे बाबा स्वच्छता पालखी रथाचे नाशिकमध्ये स्वागत
नाशिक : ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराज मिशन, अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी रथाचे आज नाशिकमध्ये आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे व उपाध्यक्ष देवराव सोनटक्के, विजय देसाई, जयराम वाघ यांनी शासनाचे या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आहे. शहरात पालखी दाखल झाल्यानंतर सेवामंडळाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी वाघ यांच्या हस्ते संत गाडगे महाराज याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी योगेश रोकडे, कैलास देवरे, विजय शिरसाठ, सुरेश शिरोडे, प्रमोद बोरसे, विष्णू पवार, रवींद्र कुंवर, मनोज म्हस्के, जितेंद्र खैरनार, अमोल राऊत, शंकर बोरसे, बजरंग दलाचे पदाधिकारी बाळा माथुरे, संजय मुळक, साळवे, विजय निकम, हेमंत अमृतकर, आठल्ले तसेच सिडको परीट- धोबी समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी महाराष्ट्र राज्य परीट- धोबी संघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सीटू भवन येथे घेण्यात आली. कार्याक्रमास सिडको परीट- धोबी समाज सेवा संस्था व पवननगर शिक्षणसंस्था यांचे सहकार्य लाभले.