पिंपळगावी गरूडझेप मशाल शिवज्योत पदयात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:00+5:302021-08-28T04:18:00+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आणि अगदी जगाच्या इतिहासालाही सोनेरी किरणे लाभलेले इतिहासाचे पान ...

Welcome to Pimpalgaon Garudzep Mashal Shivajyot Padayatra | पिंपळगावी गरूडझेप मशाल शिवज्योत पदयात्रेचे स्वागत

पिंपळगावी गरूडझेप मशाल शिवज्योत पदयात्रेचे स्वागत

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आणि अगदी जगाच्या इतिहासालाही सोनेरी किरणे लाभलेले इतिहासाचे पान आहे. शिवाजी महाराज राजगडावर सुखरूप पोहोचले होते. तो दिवस होता १७ ऑगस्ट १६६६. या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आग्रा ते राजगड अशी गरूडझेप मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या महायज्ञाचे शिलेदार सेनापतींचे चौदाव्या पिढीचे वंशज सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे, कान्होजी जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे, जाधव घराण्याचे वंशज गणेश जाधव व तानाजी मालुसरे यांचे वंशज महेश मालुसरे असे शिवविचारांचा प्रचार-प्रसार करणारे मावळे सहभागी झाले आहेत. गरूडझेपच्या माध्यमातून आग्रा ते राजगड हे १३०० किलोमीटर अंतर १३ दिवसांत धावत पूर्ण करण्याचा मानस करत ५७ शिवप्रेमी धावत आहेत.

ही गरूडझेप पदयात्रा मोहीम पिंपळगाव बसवंत परिसरात दाखल झाल्यानंतर पिंपळगाव सायकल क्लबच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

याप्रसंगी शिवज्योत रॅलीचे स्वागत करत पिंपळगाव येथील सायकलिस्ट नितीन डोखळे, संजय पवार, अरुण पवार आदींनी १०१ किमी सायकलिंग व दौड केली. वाटपाडे परिवाराने पाचोरवणी येथे शिवज्योतीचे व त्यांच्याबरोबर सर्व मावळ्यांचे औक्षण केले.

(२७ पिंपळगाव १)

270821\27nsk_4_27082021_13.jpg

२७ पिंपळगाव १

Web Title: Welcome to Pimpalgaon Garudzep Mashal Shivajyot Padayatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.