नववर्षाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
By Admin | Updated: January 1, 2016 23:14 IST2016-01-01T22:43:50+5:302016-01-01T23:14:53+5:30
गुडबाय २०१५ : सायकल चालवा अभियानात शेकडो कळवणकर सहभागी

नववर्षाचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
कळवण : २०१६ या नव्या वर्षात कळवणकरांनी नवीन संकल्प केला असून, आम्ही भारतीय कळवण आयोजित सायकल चालवा अभियानाला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला.
या अभियानात शहरातील नामवंत वैद्यकीय व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर पहिल्याच दिवसापासून सायकल चालवा अभियानाला कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ७ वाजता एसटी बसस्थानकापासून प्रारंभ करण्यात आला.
अभियानात कमको बॅँकेचे संचालक प्रवीण संचेती, माजी संचालक प्रकाश संचेती, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. के. टी. बागुल, बालरोगतज्ज्ञ दीपक बहिरम, नगरसेवक नितीन पाटील, डॉ. रवींद्र भामरे, डॉ. चेतन भावसार, प्रा. एच. के. शिंदे, प्रा. सी. आर. गांगुर्डे, संदीप अमृतकार, बापू कुमावत, राजेंद्र मालपुरे, राजेश मुसळे, बापू पगार, आर. के. एम. माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक एल. डी. पगार, ए. डी. गवळी आदिंसह शेकडो युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व मान्यवरांनी सहभाग नोंदविला.
सायकल चालवा अभियानाला एसटी बसस्थानकापासून सुरुवात होऊन भाजी मंडई, गांधी चौक, सुभाष पेठ, नेहरू चौक, फुलाबाई चौक, फाशी चौक, सावरकर चौक, मेनरोड, शिवाजीनगर, गणेशनगर भागात कळवणकरांना ‘सायकल चालवा, इंधन वाचवा, आरोग्य जपा’ असे आवाहन करण्यात आले. (वार्ताहर)