शिवनेरी किल्ल्यावर साफसफाई करत नवीन वर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:45 IST2021-01-02T17:36:03+5:302021-01-03T00:45:08+5:30

मानोरी : स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने नव्या वर्षाचे स्वागत किल्ले शिवनेरी येथे साफसफाई मोहीम राबवून करण्यात आले. गेल्या ...

Welcome New Year by cleaning Shivneri fort | शिवनेरी किल्ल्यावर साफसफाई करत नवीन वर्षाचे स्वागत

शिवनेरी किल्ल्यावर साफसफाई करत नवीन वर्षाचे स्वागत

मानोरी : स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने नव्या वर्षाचे स्वागत किल्ले शिवनेरी येथे साफसफाई मोहीम राबवून करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्व गडकिल्ले पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. या गोष्टीचा विचार करत व गडकिल्ल्यांवर होणारा कचरा, घाण या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेत, तसेच नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने कसे करता येईल, या सर्व बाबी लक्षात घेऊन स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले शिवनेरी येथे साफसफाई मोहीम राबविण्यात आली. किल्यावर झालेला कचरा, घाण, प्लास्टीक या सर्व गोष्टींची स्वराज्य फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक आतिश शार्दूल, अध्यक्ष हर्ष जाधव, उपाध्यक्ष हर्षद आहेर, तसेच सर्व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Welcome New Year by cleaning Shivneri fort