येवल्यात जनाधिकार रॅलीचे स्वागत
By Admin | Updated: July 4, 2017 23:44 IST2017-07-04T22:46:34+5:302017-07-04T23:44:40+5:30
येवला : नागपूर ते चैत्यभूमी जनाधिकार रॅली सोमवारी सकाळी येवल्यात आली.

येवल्यात जनाधिकार रॅलीचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : भारिप बहुजन महासंघाने काढलेली नागपूर ते चैत्यभूमी जनाधिकार रॅली सोमवारी सकाळी येवल्यात आली.
१ जुलै रोजी नागपूर संविधान चौकातून निघालेली रॅली दादर चैत्यभूमीवरून थेट मंत्रालयात जाणार आहे. आपल्या विविध मागण्यांसह कार्यकर्त्यांचे संघटन ही भूमिका घेऊन सदर रॅली निघाली आहे. येवल्यात मुक्तिभूमीवर झालेल्या कार्यक्रमात येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांचे स्वागत आंबेडकरी चळवळीचे नेते नानासाहेब पटाईत यांनी स्वागत केले.
जनाधिकार रॅलीचे प्रमुख तथा भारिप बहुजन महासंघाचे सावनेर तालुकाध्यक्ष अजय शहारे, पंकज जामगडे, महिला आघाडीच्या प्रमुख कविता मेश्राम यांची यावेळी भाषणे झाली. या रॅलीत नानासाहेब पटाईत, शेखर गायकवाड, अनिल वाघ, जितेश पगारे, अतुल घोडेराव, बाळू जगताप, सुभाष गांगुर्डे, संजय गांगुर्डे, वसंतराव सोनवणे, कुणाल निंदाने यांच्यासह सामाजिक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.