जनसंघर्ष यात्रेचे देवळ्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:54 IST2018-10-08T00:53:14+5:302018-10-08T00:54:24+5:30

देवळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे रविवारी (दि.७) येथील पाचकंदील चौकात आगमन झाले.

Welcome to the Jan Sanghshara Yatra | जनसंघर्ष यात्रेचे देवळ्यात स्वागत

जनसंघर्ष यात्रेचे देवळ्यात स्वागत

ठळक मुद्दे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत तालुकाध्यक्ष दिलीप पाटील व चांदवड -देवळा विधानसभा युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या हस्ते यात्रेचे स्वागत

देवळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे रविवारी (दि.७) येथील पाचकंदील चौकात आगमन झाले.
पाचकंदील चौकात दुपारी चार वाजता देवळा तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत तालुकाध्यक्ष दिलीप पाटील व चांदवड -देवळा विधानसभा युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या हस्ते यात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, निर्मला गावित, शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार शंकर अहिरे, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, तालुका उपाध्यक्ष दिनकर निकम, गंगाधर शिरसाठ, डॉ. भास्कर सावंत, स्वप्नील सावंत, समाधान जामदार, महिला अध्यक्षा अरुणा खैरनार, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र अहेर, महेश पवार, संजय सावळा, ज्ञानदेव वाघ, अरु ण पवार, साहेबराव पाटील, शाहू शिरसाठ, अमोल ठाकरे, संजय ठाकरे, जिभाऊ गुजरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Welcome to the Jan Sanghshara Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.