रिमझिम पावसात बाप्पाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:16 IST2020-08-22T21:53:56+5:302020-08-23T00:16:12+5:30
जानोरी : मोहाडी गाव व परिसरात रिमझिम पावसाच्या साक्षीने अन,ह्णगणपती बाप्पा मोरया ह्य, ह्यमंगलमूर्र्ती मोरयाह्णअसा जयघोष ,करीत उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

रिमझिम पावसात बाप्पाचे स्वागत
ठळक मुद्देगणेशमूर्ती विक्री केंद्रावर भाविकांनी गर्दी केली होती.
जानोरी : मोहाडी गाव व परिसरात रिमझिम पावसाच्या साक्षीने अन,ह्णगणपती बाप्पा मोरया ह्य, ह्यमंगलमूर्र्ती मोरयाह्णअसा जयघोष ,करीत उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच ग्रामपालिकेच्या शेडमध्ये गणेशमूर्ती विक्री केंद्रावर भाविकांनी गर्दी केली होती. आपापल्या घरात श्रीगणेश प्रतिष्ठापणेचा मुहूर्त साधत दिवसभर भाविकांचा बाजरात राबता होता. श्रद्धेप्रमाणे भाविकांनी गणेशमूर्ती खरेदी करून त्याची प्रतिष्ठापना केली. दिवसभर मोहाडीत भक्तिमय वातावरणात श्रीची स्थापना करण्यात आली.