राजापूर येथील आठवडे बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:36 IST2020-08-27T23:31:40+5:302020-08-28T00:36:25+5:30

राजापूर : येथील रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याची माहिती विस्तार अधिकारी आनंद यादव, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी दिली आहे.

Weekly market closed at Rajapur | राजापूर येथील आठवडे बाजार बंद

राजापूर येथील आठवडे बाजार बंद

ठळक मुद्देलगतच्या गावात कोरोनाचा शिरकाव

राजापूर : येथील रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याची माहिती विस्तार अधिकारी आनंद यादव, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी दिली आहे.
राजापूर येथे दर रविवारी भरणारा आठवडे बाजारात बाहेरगावाहून विक्र ेते व ग्राहक येत असल्याने बाजारात गर्दी होत होती. लगतच्या गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राजापूर ग्रामस्थांनी बाजार बंद ठेवण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानुसार प्रशासक यादव व ग्रामविकास अधिकारी मंडलिक यांनी रविवारचा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
बाजार भरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजापूर येथील शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला दररोज सकाळी गावात विक्री करावा व रविवारी कोणीही भाजीपाला विक्र ीसाठी आणू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

Web Title: Weekly market closed at Rajapur