नगरसुल येथील आठवडे बाजार उन्हामुळे शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:59 IST2019-03-23T18:58:13+5:302019-03-23T18:59:57+5:30
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.

नगरसुल येथील आठवडे बाजार उन्हामुळे शुकशुकाट
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार दर शुक्र वारी भरतअसुन दिवसेंदिवस गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. शिमग्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन शुक्र वारी दुपारी तीन साडे पर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
दुकानदार दुकान मांडुन गप्प बसलेली दिसत होती. नगरसुल आठवडे बाजार हा येवल्यानंतर अंदरसुल प्रमाणे मोठा भरतो नगरसुल गावाला बर्याच खेड्याचा संपर्क असल्याने आठवडे बाजार हा खुप मोठा भरतो तो दुसरी परंतु सद्य उन्हाची तिव्रता जास्त जानवर असल्याने चार साडे चार नंतर बाजार भरतांना दिसतो तो उशिरा पर्यंत दिसतो.
येवला तालुक्यातील पुर्व-उत्तर भागातील खेडोपाड्यामध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात पिकविला जात असल्याने आणि दुर्दैवाने ह्याच भागात पावसाने ओढ दिल्याने भाजीपाला उत्पन्न कमी झाले आहे.
या भागात गेल्या तीन चार वर्षांपासुन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही, मजुरांना हाताला काम नाही. परीणामी मजुरांवर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली. त्याचा परिणाम बाजर पेठावर पडला. ह्या नगरसुल आठवडे बाजारात सर्व भाजीपाला हा बाहेरु न येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेदिवस वाढत चालले आहेत. वांगी, भेंडी, मिरची, गवार, कोबी, फ्लावर, शेवगा, दोडका, गिलके आदींचे भाव वाढले असून पाले भाज्यांसाठी पंधरा रु पयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. तर कारले, गवार दिसेनासे झाली आहे.
(फोटो २३ नगरसुल)