ममदापूर येथे आठवडी बाजार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:54 IST2019-02-06T18:53:19+5:302019-02-06T18:54:16+5:30

ममदापूर : प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेच्या निर्णण्यानुसार ममदापूर येथे आठवडे बाजार सुरु करण्यात आला. ग्रामसभेत ग्रामस्थांनी ममदापूर हे मध्यवर्ती ...

Weekend market started at Mammadpur | ममदापूर येथे आठवडी बाजार सुरुवात

ममदापूर येथे आठवडी बाजार सुरुवात

ठळक मुद्दे हा बाजार चालू झाल्याने ग्रामस्थांचे वेळ आणि पैसा वाचणार

ममदापूर : प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेच्या निर्णण्यानुसार ममदापूर येथे आठवडे बाजार सुरु करण्यात आला.
ग्रामसभेत ग्रामस्थांनी ममदापूर हे मध्यवर्ती गाव असून येवला, नांदगाव, वैजापूर या तीनही तालुक्याच्या मध्यवर्ती ममदापुर असून सर्वच आठवडे बाजार हे पंचवीस ते तीस किलोमीटर वरती आहेत. परिसरातील ग्रामस्थांना आठवडी बाजारासाठी साधारणता शंभर ते दोनशे रु पयांच्या खर्च करून बाजारासाठी जावे लागते व कामधंदा बुडवून दिवसही वाया जातो तसेच काही शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला विक्र ीसाठी देखील तालुक्याच्या गावी गेल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे जर आपल्या ममदापूर गावातच आठवडे बाजार झाल्यास राजापूर, सोमठाण देश, खरवंडी, देवदरी, रेंडाळा, रहाडी, कोळगाव, या गावातील शेतकºयांना व ग्रामस्थांना सोयीस्कर असा हा ममदापूर येथील बुधवारचा बाजार सुरु करावा अशी ग्रामसभेत चर्चा झाली.
या सर्वच गोष्टीचा विचार करून ममदापूर येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने बुधवारचा बाजार करण्याचे ठरले त्यासाठी परिसरातील गावात ममदापूर येथे बुधवारी बाजार भरणार आहे अशा प्रकारचे प्रचार प्रसार करण्यात आला या गोष्टीचा सर्व स्तरातून विचार होऊन पहिल्याच बाजारात शंभरच्या आसपास दुकाने लागली.
ममदापुर ग्रामस्थांनी व शेजारील गावातील लोकांनी गर्दी केली होती. भाजीपाला, फळे, कपडे,किराणा अशा सगळ्याच प्रकारचे दुकान थाटल्याने परिसरातील ग्रामस्थांनी देखील सर्वच दुकानातून काहीना काही खरेदी केले. त्यामुळे विक्र ीला आणलेल्या विक्र ेत्यांचे पण मालविक्री झाल्याने खुशीचे वातावरण होते.
लोकांना देखील भाजीपाल्यासह सर्वच किराणा बाजार गावात उपलब्ध झाल्याने वेळ व पैशाची बचत झाली आहे. बरेच लोक कामासाठी बाहेर गेल्याने काही प्रमाणात गर्दी केली असली बाजार हा वाढणार आहे. त्यामुळे ममदापूर मध्ये प्रथमच भरलेल्या बाजार मध्ये पहिल्याच बाजारात एवढी गर्दी झाल्याने पुढील आठवड्यापासून जास्त गर्दी वाढण्याचा अंदाज आहेत.
शनी मंदिर येथील पटांगणात आजचा बाजार भरण्यात आला होता. हा बाजार चालू झाल्याने ग्रामस्थांचे वेळ आणि पैसा वाचणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Weekend market started at Mammadpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार