मालेगाव शहरातील आठवडे बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:02 PM2020-01-16T23:02:13+5:302020-01-17T01:22:00+5:30

मालेगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शहराची वाढती लोकसंख्या पाहता मूलभूत सुविधांचा मोठा वानवा आहे. अनेक पायाभूत गरजा पूर्ण न झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Weekend Empire in Malegaon city for weeks | मालेगाव शहरातील आठवडे बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य

मालेगाव शहरातील आठवडे बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य

Next
ठळक मुद्देसुविधांचा अभाव : प्रत्येक प्रभागात स्मार्ट फळे व भाजीपाला मार्केटची गरज

मालेगाव : मालेगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शहराची वाढती लोकसंख्या पाहता मूलभूत सुविधांचा मोठा वानवा आहे. अनेक पायाभूत गरजा पूर्ण न झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मालेगाव शहरात तसे मार्केट नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. जे मार्केट उपलब्ध आहे, त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. मार्केट, गांधी मार्केट, मच्छी बाजार, सोमवार बाजार ही मोक्याची बाजाराची ठिकाणे आहेत. त्या त्या परिसराच्या दृष्टीने अतिशय तोकडी आहेत. कमी जागा व अतिक्रमण ठिकाणावर असलेल्या बाजारांमुळे महिलांना दाटीवाटीची धक्के सहन करावे लागतात. मालेगाव शहराची गरज ओळखून खुल्या जागेवर प्रत्येक प्रभागात मार्केट व बाजारासाठी ओटे होण्याची गरज आहे. अनेक भागातील अस्वच्छता व बकालपणा ही बाजारांच्या ठिकाणांहून सुटलेली नाही. सोमवार बाजार भागातील नव्याने बांधलेल्या शॉपिंग गाळे व बाजार ओट्यावर जनावरांचा व डुकरांचा मुक्त संचार आहे तर याच ठिकाणी भरदिवसा मद्यपी मद्य पीत बसतात व गाळे नसून ते नागरिकांचे लघुशंका करण्याचे ठिकाण बनले आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. यामुळे येथील बाजाराचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. सोमवार बाजारात महापालिकेच्या निधीतून मोठ्या प्रमाणात गाळे व भाजी विक्रेत्यांसाठी बाजार ओटे बांधले आहेत. मात्र लिलाव व न्यायालयीन वादात हा बाजार अडकला आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून बाजार तयार असुनही त्याचा उपयोग झालेला नाही. कॅम्प भागातील विक्रेते सोमवार बाजाराच्या रस्त्यावर भाजीपाल्याचे दुकान थाटतात. येथे घाणीचे साम्राज्य आहे. येथे तालुक्यातील डाबली, अजंग, वडगाव, पिंपळगाव, दाभाडी, चिखलओहोळ, खडकी, सवंदगाव, रावळगाव आदी ठिकाणाहून भाजीपाला रोज विक्रीसाठी येतो. ताज्या व टवटवीत भाजीपाल्यांची सोमवार बाजार मार्केटची ओळख आहे. सध्या बाजार ओट्यांचा होणारा गैरवापर, झालेली दुरावस्था, जनावरे व डुकरांचा वावर, रिकामटेकड्या नागरिकांचा पत्त्यांचा डाव यामुळे महापालिकेचा या ओट्यांवर झालेला खर्च अनाठायी आहे. सरदार मार्केट, गांधी मार्केट, मच्छी बाजार येथील स्थितीही काही वेगळी नाही. मार्केट व बाजारांच्या ठिकाणांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर लहान निकेते व हॉकर्स अतिक्रमण करतात. भाजीपाला विक्रेत्यांकडून मनपा सक्तीचा कर घेते. परंतु त्यांना सुविधा देत नाही. त्यामुळेच भाजीपाला व्यावसायिक आडमुठेपणाने रस्त्यावर ठाण मांडतात. महापालिकेने बांधलेली गाळे व बाजार ओटे. भाजीपाल्यासाठी छोटे आहेत. या परिसरात पानाच्या सुविधेसह स्वच्छतागृहाची गरज असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. रामसेतू भागातील भाजीबाजार शंभर वर्षांपूर्वीचा आहे. त्याचे नूतनीकरण झाले नाही. शासनाच्या या जागेवर पालिकेने बाजार विकसीत केला आहे. रामसेतू वरील बाजाराचे नुतनीकरण होणे गरजेचे आहे. महापालिकेने नियोजन केल्यास या भागाचा कायापालट होईल. तसेच भाजीपाला विक्रेत्यांची देखील सोय होणार आहे.

शहरालगतच्या अनेक खेड्यातून भाजीपाला घेऊन शेतकरी येतात, मात्र भाजी बाजारात इतर शहराप्रमाणे चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर दुकाने थाटतात स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना रोज सकाळी चांगला भाजीपाला मिळावा, यासाठी या भाजी विक्रेत्यांना प्रत्येक मार्केटमध्ये सुविधायुक्त जागा अथवा गाळा उपलब्ध व्हावा. मोकाट जनावरे थेट मार्केटमध्ये शिरतात यामुळे महिलावर्गांमध्ये भीती निर्माण होते.
- विद्या बच्छाव, मालेगाव

गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी भाजीपाला व किरकोळ विक्रेते असतात. यामुळे बाजारात आलेल्या महिलांना सातत्याने त्रास होते. कॅम्प भागातील अतिक्र मण व बाजारातल्या दाटीचा फायदा घेत अनेकदा चोरीचे प्रकारदेखील घडले आहेत. महानगरपालिकेने प्रत्येक भागात मार्केट विकसित करावे.
- अर्चना गरुड, मालेगाव कॅम्प

Web Title: Weekend Empire in Malegaon city for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य