चक्क स्मशानभूमीत लागले लग्न... राजी दोन्ही कुटुंब, लग्नाला गर्दी
By Admin | Updated: May 15, 2014 21:58 IST2014-05-15T19:26:33+5:302014-05-15T21:58:26+5:30
येवला : वेळ : दुपारी १२.३५ ची वार : गुरुवार, दिनांक १५ मे २०१४ लागले शुभ मंगल सावधान, मात्र स्थळ-येवल्याचे अमरधाम, अहो जीवनाची जेथे अखेर होते तेथेच केली आपल्या संसाराची सुरुवात

चक्क स्मशानभूमीत लागले लग्न... राजी दोन्ही कुटुंब, लग्नाला गर्दी
येवला : वेळ : दुपारी १२.३५ ची वार : गुरुवार, दिनांक १५ मे २०१४ लागले शुभ मंगल सावधान, मात्र स्थळ-येवल्याचे अमरधाम, अहो जीवनाची जेथे अखेर होते तेथेच केली आपल्या संसाराची सुरुवात
अहो अमरधाममध्ये लागले लग्न ही एकच चर्चा, येवलेकरांच्या अंधश्रद्धेला, स्मशानवैराग्याच्या कल्पनेला मुठमाती देऊन गेली.
येवला पालिकेत अमरधामची देखभाल करण्याची जबाबदारी सांभाळणारे लक्ष्मण गंगाधर देखभाल करण्याची जबाबदारी साभाळणारे लक्ष्मण गंगाधर करमचे गेल्या १० वर्षापासुन नोकरी करत अमरधाम येथेच कुटुंबासह राहतात. याची कन्या सोनल हिचा शुभविवाह औरंगाबाद येथील लक्ष्मण गंगाधर गायकवाड यांचे सुपुत्र भरत यांचेशी निश्चित झाला. लॉनचा मोठा खर्च, वाढती महागाई आणि रुढी, पंरपरा अंधश्रद्धा या सार्या गोष्टींना फाटा देत दोन्ही कुटुंबांनी वुधचे निवासस्थानच असलेल्या अमरधाम येथेच विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतला.
विवाहसोहळ्यासाठी पालिकेचे अध्यक्ष निलेश पटेल, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक प्रदीप सोनवणे, रिजवान शेख, दत्ता निकम यांचेसह अनेक मान्यवर व वर्हाडीमंडळी, पालिकेचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.
स्मशानभूमीकडेचा विचार डोक्यात येताच अनेकजण गलीतमात्र होतात. हळद लागलेला नवरदेव गावाची वेस देखील ओलांडत नाही तर चक्क लग्नच स्माशनभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ लाऊन करमंचे व गायकवाड परिवाराने आपल्या वंशाच दिव्याची सुरुवातच अंधश्रद्धा भिती व वैराग्याचा विचाराला लाथाडून केली आहे.
करमंचे व गायकवाड परिवाराचे वर वधुपीत्याचे नावेही लक्ष्मण गंगाधर करमंचे, व लक्ष्मण गंगाधर गायकवाड आहेत यातही कमालीच्या साम्यामुळे त्यांची रासही ज्योतीषीभाषेत जुळली आहे.
गेल्या १० वर्षापासून याच परिसरात आमची मुलं लहानाची मोठी झाली. रोजच स्मशानभूमीचं चित्र आम्ही पाहतो. निसर्गरम्य बगीच्या सारखं इथं वातावरण आहे. त्यामुळे लोकांना इथं भिती वाटतं आमचा निवास व रोजीरोटी इथंच आहे. मग शुभमंगल करण्यास इथं काय हरकत आहे.
सौ. गंगुबाई लक्ष्मण करमंचे
वधुची आई