चांदोरी येथे ताण-तणाव व्यवस्थापन विषयावर वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 06:33 PM2020-06-25T18:33:42+5:302020-06-25T18:35:03+5:30

चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी ता. निफाड जि. नाशिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने प्रमुख अतिथी डॉ. नरेंद्र तेलरंध्ये, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामहरी दातीर यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू (कोविड-१९) काळातील परिस्थितीचा विचार करून ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

Webinar on Stress Management at Chandori | चांदोरी येथे ताण-तणाव व्यवस्थापन विषयावर वेबिनार

चांदोरी येथे ताण-तणाव व्यवस्थापन विषयावर वेबिनार

Next
ठळक मुद्दे आवश्यक ताण-तणाव व्यवस्थापनाचे धडे यावेळी त्यांनी दिले.

चांदोरी : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी ता. निफाड जि. नाशिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने प्रमुख अतिथी डॉ. नरेंद्र तेलरंध्ये, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामहरी दातीर यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू (कोविड-१९) काळातील परिस्थितीचा विचार करून ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अशोका एज्युकेशन फाउन्डेशनचे अ‍ॅसिस्टंट डायरेक्टर डॉ. नरेंद्र तेलरंध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंटरनेटचा वापर करून घेण्यात आलेल्या या वेबिनार कार्यशाळेला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलतांना डॉ. तेलरंध्ये यांनी सांगितले की, कोरोना ही एक वैश्विक बिमारी झालेली असून आपल्याला जो पर्यंत त्यावर रामबाण औषध उपलब्ध होत नाही तो पर्यंत त्या सोबत जगण्याची सवय करावी लागणार आहे. अखंड विश्वामध्ये थैमान घातलेल्या या आजारामुळे आपण आपले मानसिक व शारीरिक संतुलन न गमावता त्याला प्रभावीपणे सामोरे गेले पाहिजे तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकू. त्यासाठी आवश्यक ताण-तणाव व्यवस्थापनाचे धडे यावेळी त्यांनी दिले. तसेच हा तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती त्यांनी सोदाहरण स्पष्ट केल्या.
सदर वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. रामहरी दातीर, प्रा. राहुल पोटे, प्रा. प्रवीण आहेर, प्रा. अश्विनी जंजाळे, प्रा. बाळू चौधरी, प्रा. हणमंत वाघमारे, प्रा. शिल्पा शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Webinar on Stress Management at Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.