मौसम धरती के शृंगार का...
By Admin | Updated: August 1, 2016 01:37 IST2016-08-01T01:27:54+5:302016-08-01T01:37:24+5:30
झुला महोत्सव : समाजबांधवांची गर्दी

मौसम धरती के शृंगार का...
नाशिक : श्रावणानिमित्त साजरा केला जाणाऱ्या खाटूधाम येथील श्री श्यामबाबा यांच्या झुला महोत्सवात भाविक विविध भक्तिगीतांमध्ये तल्लीन झाले. गिरधर मेरे मौसम आया, धरती के शृंगार का...यासारख्या भजनांनी यावेळी कोलकाता येथी प्रख्यात भजनगायक विनय तोदी व लव अग्रवाल यांनी उपस्थितांना जिंकून घेतले.
गंगापूररोडवरील नक्षत्र लॉन्स येथे श्री श्याम सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित झुला महोत्सवात खास कोलकाता येथून मागविण्यात आलेल्या विविध फुलांनी श्री श्याम बाबांचा शृंगार करण्यात येऊन दरबार सजविण्यात आला होता. मुंबई येथील भजनी मंडळासोबतच तोदी, अग्रवाल व सुरेश पारिक यांनी ‘ये है खाटूवाला, निले घोडेवाला भक्तो का रखवाला...’, ‘सुरत पे थारी गिरधारी मैं वारी जाऊ...,’ ‘काली कमलीवाला मेरा यार हैं...,’ अशा एकापेक्षा एक सरस भजन व भक्तिगीतांचे सादरीकरण करत उपस्थित भाविकांची दाद मिळविली. या आरास उभारणीमधून श्यामसेवा मंडळाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे संयोजक सुशील केडिया यांनी सांगितले. दरम्यान, पंकज परसरामपुरिया, ललित रुंग्ठा, महेंद्र पोद्दार, पवनकुमार शर्मा, जुगल देवडा, किशोर संघई आदिंनी झुला महोत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते. (प्रतिनिधी)