शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

शस्त्रसाठा जप्त प्रकरण : मुंबई येथून राज्याचे दहशतवादविरोधी पथक नाशिकमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:04 IST

दोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अ‍ॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा, असा भला मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला.

ठळक मुद्देदोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अ‍ॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा मुंबईचा कुख्यात गुंड बादशाह ऊर्फ सुका पाचा, नागेश राजेंद्र बनसोडे, सलमान अमानुल्लाखान यांनी उत्तर प्रदेशमधून शस्त्रांचा साठा लुटला राज्याची सुरक्षा यंत्रणा सतर्क

नाशिक : अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित ऊर्फ सुका पाचा हा तिघा साथीदारांच्या मदतीने शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जीपमधून घेऊन नाशिकमार्गे मुंबईत पोहचविण्याच्या तयारीत होता; मात्र नाशिकच्या सीमेवरच चांदवडमध्ये पोलिसांनी त्याचा कट उधळून लावला. मुंबईत घातपात घडविण्याची शक्यता असल्याची बाब पुढे आल्यानंतर मुंबई दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) नाशिकमध्ये दाखल झाले आहे.दोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अ‍ॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा, असा भला मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला. ही शस्त्रास्त्रे मुंबईमध्ये घातपात घडविण्याच्या दृष्टीने पोहचविली जात होती का? याबाबत पोलिसांनी कुठलाही खुलासा केला नाही; मात्र सदर शस्त्रसाठा जप्त झाल्यानंतर राज्यभरातील सर्व पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, दहशतवादी विरोधी पथक ‘अ‍ॅक्शन’मध्ये आले आहे. मुंबईचा कुख्यात गुंड बादशाह ऊर्फ सुका पाचा, नागेश राजेंद्र बनसोडे, सलमान अमानुल्लाखान यांनी उत्तर प्रदेशमधील शस्त्रांचा साठा गुदामामधून लुटला आणि त्यानंतर नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने हे तिघे बोलेरो जीपमधून निघाले होते.

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईनंतर अवघ्या राज्याची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. यानंतर मुंबईचे दहशतवादविरोधी पथक, उत्तर प्रदेशमधील बांदा पोलीस नाशिकला दाखल झाले आहेत. एकूणच नाशिक ग्रामीण पोलिसांनी एटीएस, बांदा पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे गतिमान केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिकUttar Pradeshउत्तर प्रदेशMumbai policeमुंबई पोलीस