नाशिकरोड : देवळालीगाव मालधक्का येथे इसमास व त्याच्या आई व पत्नीला मारहाण करून युवकावर धारधार हत्याराने वार करून जखमी केले. मालधक्का रोड, इंदिरा विकासनगर येथील गणेश मनोहर पगारे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या घरासमोर राहणारी सोनी राजेंद्र शेलार याची माझा मोठा भाऊ पंकज पगारे याच्याशी ओळख आहे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोनी शेलार हिचे मनमाडहून आलेले भाऊ संशयित गौतम व राहुल आणि त्यांची आई माझ्या घरी आले. त्यांनी गणेश याला धमकी दिली. संशयित गौतम याने त्याच्या हातातील धारधार हत्याराने गणेशच्या डोक्यावर मारून जखमी केले. गणेशची आई व पत्नी सोडविण्यास आले असता त्यांनाही राहुलने शिवीगाळ करून दांडुक्याने मारहाण करून जखमी केले.
मालधक्क्यावर कुटुंबीयांवर शस्त्राने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 01:05 IST