शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आम्ही घेतले नाहीत, तेवढेच उरले पवार यांच्या पक्षात !देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 02:16 IST

महाराष्टÑातील निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असून, महायुतीच्या समोर लढण्यासाठी कॉँग्रेस शिल्लक राहिलेली नाही, तर शरद पवार यांच्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये कोणी राहण्यासाठी तयार नाही. सध्या पवार यांच्यासोबत जे पक्षात राहिले आहेत, तेदेखील आमच्या संपर्कात होते, आमच्याकडे जागा नव्हती व खुर्च्या रिकाम्या नसल्यामुळे आम्हीच त्यांना पक्षात घेतले नाही, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठळक मुद्दे गोदाघाटावरील जाहीरसभेत गौप्यस्फोट

नाशिक : महाराष्टÑातील निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असून, महायुतीच्या समोर लढण्यासाठी कॉँग्रेस शिल्लक राहिलेली नाही, तर शरद पवार यांच्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये कोणी राहण्यासाठी तयार नाही. सध्या पवार यांच्यासोबत जे पक्षात राहिले आहेत, तेदेखील आमच्या संपर्कात होते, आमच्याकडे जागा नव्हती व खुर्च्या रिकाम्या नसल्यामुळे आम्हीच त्यांना पक्षात घेतले नाही, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पवार यांचे तेल लावलेले पैलवान एकमेकांच्या विरोधात लढले व त्यांना सोडून गेले त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला.गोदाघाटावर युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुकीतकोणाचे सरकार सत्तेवर येणार, कोणाच्या किती जागा निवडून येणार याची चर्चा व्हायची. यंदाची निवडणुकीत मात्र विरोधीपक्षच शिल्लक राहिलेला नाही. कॉँग्रेसचे राहुल गांधी हे निवडणुकीच्या तोंडावर बॅँकॉकला गेले, तेथून परतल्यावर त्यांनी मुंबईत सभा घेतली त्यात त्यांनी ७० वर्षांपासून जनतेवर अन्याय होत असल्याचे सांगितले व एक प्रकारे भाजपचाच प्रचार करून गेले. त्यामुळे गेल्या वेळी ४२ जागा निवडून आलेल्या कॉँग्रेसच्या यंदा २१ जागा तरी येतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षात कोणी राहण्यास तयार नाही. जे आहेत ते आमच्या संपर्कात होते, पक्षात घ्या म्हणून आग्रह करीत होते. मात्र आमच्याकडे जागा नसल्यामुळेच ते पवार यांच्याकडे थांबले आहेत. असे सांगून, पवार स्वत:ला कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणवून घेत असले व त्यांच्याकडे तेल लावलेले पैलवान असले तरी, हे सारे पैलवान एकमेकांच्या विरोधात लढले व पवार यांना सोडून गेले, त्यामुळे पवार यांची अवस्था शोलेतील जेलर सारखी झाल्याची टीका फडणवीस यांनी केली.गेल्या पाच वर्षांत आपल्या सरकारने आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक कामे केली असून, हिम्मत असेल तर आघाडीने आपल्या पंधरा वर्षांतील कामाचा हिशेब द्यावा, आपण पाच वर्षांच्या कामाचा हिशेब देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले.यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, माजी संघटनमंत्री डॉ. रघुनाथ कुलकर्णी, विजय साने, सुनील बागुल, वसंत गिते, प्रकाश लोंढे, गिरीश पालवे, पक्षाचे उमेदवार आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले आदी उपस्थित होते....तर तुम्हाला ‘भ्रष्टाचार रत्न’ पुरस्कार मिळू शकतोआपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी भूमिका भाजपने घेतल्याने त्याला कॉँग्रेसच्या पक्ष प्रवक्त्याने विरोध केल्याचे सांगितले. सावरकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान पाहता, ते भारतरत्न पुरस्कारासाठी पात्रच आहेत, परंतु कॉँग्रेसला जर एखादा पुरस्कार द्यायचाच ठरला तर भ्रष्टाचार रत्नच पुरस्कार मिळू शकतो, अशी टीका करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सावरकर यांच्याविषयी कॉँग्रेसला आदर असल्याचे सांगितले, जर कॉँग्रेसला सावरकरांविषयी आदरच होता तर मग निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसला आता सावरकरांचा पुळका आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.भुजबळांना फुले यांचा भारतरत्न मान्य नाही कास्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी भाजपची भूमिका असून, महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्यावर छगन भुजबळ यांनी ‘भारतरत्ना’पेक्षा ‘महात्मा’ पदवी मोठी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जर भुजबळ यांना ‘महात्मा’ ही पदवी मोठी वाटत असेल तर फुले यांना देण्याची शिफारस केलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार मान्य नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा