शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशिक विभागातील चारसह राज्यातील 27 पॉलिटेक्निक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर

By नामदेव भोर | Updated: April 20, 2019 15:03 IST

दहावीनंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागा राज्यातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने राज्यातील तब्बल २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी मबाविद्यालय बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले असून यात नाशिक विभा गातील तीन महाविद्यालयांचा समावशे आहे. त्यामुळे नाशिकमधील जवळपास सातशे ते आठशे जागांसह राज्यातील तब्बल ५ हजार जागा कमी होण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देनाशिकच्या सातशे ते आठशे जागांसह राज्यातील 5 हजार जागा घटण्याची शक्यता प्रवेशांअभावी राज्यातील २७ पॉलिटेक्निक महाविद्यालये होणार बंदनाशिक विभागातील डी.फार्मसीसह चार महाविद्यालयांचा समावेश

नाशिक : दहावीनंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागा राज्यातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने राज्यातील तब्बल २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी मबाविद्यालय बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले असून यात नाशिक विभा गातील तीन महाविद्यालयांचा समावशे आहे. त्यामुळे नाशिकमधील जवळपास सातशे ते आठशे जागांसह राज्यातील तब्बल ५ हजार जागा कमी होण्याचे संकेत आहेत.तंत्रनिकेतन महाविद्यालयांना रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांकडून येणाºया फिमध्ये महाविद्यालयांचा खर्च भागविणे कठीण झाले असून काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशच होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविद्यालायंना शिक्षकांचे वेतन व अन्य खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध  होत नसल्याने राज्यातील अशा २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून महाविद्यालय बंद करण्याच प्रस्ताव  अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) सादर केले आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आले असले तरी ही महाविद्यालये थेट बंद करता येणार नसल्याचे संचालनालयाकडून सांगण्यात येत असून महाविद्यालयातील शिकणाºया विद्यार्थ्यांची सुविधा, कर्मचारी अन्य बाबी तपासून महाविद्यालय बंद करण्यासंदर्भात विचार केला जाईल. महाविद्यालये बंद करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने वर्षनिहाय राबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विद्यार्थी नसलेले महाविद्यालये तत्काळ बंद विद्यार्थीच नसतील ती महाविद्यालये तत्काळ बंद होण्याची शक्यता आहे. दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविका घेऊन विद्यार्थी बाहेर पडत होते. मात्र आता या अभ्यासक्रमांना दहावीचा निकालाचा टक्का वाढल्याने उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षीया अभ्यासक्रमांच्या तब्बल ७२ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यामध्ये नाशिक विभागातील मनमाड येथील शेजवळ पॉलिटेक्निक, जळगाव येथील एसएमची पॉलिटेक्निक व डी फार्मसी  आणि जीएस रायसोनी पॉलिटेक्निक महाविद्यालयांचा समावेश आहे. यामुळे झाले प्रवेश कमी!*विद्यार्थी दहावीनंतर आयटीआय, द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे असलेला ओढा आणि बारावीनंतर बी.एस्सी आयटी, बीएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाची ओढ यामुळे या पदविका अभ्यासक्रमाला फटका बसत आहे.*पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांनाच उद्योग क्षेत्रातून मागणी रोडावली आहे. संस्थाचालकांकडून घेण्यात येणारी फी आणि या अभ्यासक्रमाचे महत्त्व कमी झाल्याने रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. *अनेक महाविद्यालयांच्या जागा रिकाम्या राहिल्याने संस्थाचालकांना परवडत नसल्याने महाविद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाकडे आले आहेत. या प्रस्तावाबाबत संचालनालयाकडून सर्व बाबी तपासून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दि्वतीय वर्ष पदवीच्या जागांमध्ये १० टक्के कपातअभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु,यातील १०टक्के जागा कमी झाल्याने आता पदवी प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार असल्याने विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण पदविकेला प्रवेश आणखी घटण्याची शक्यता ओळखून राज्यातील २७ संस्थांनी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविली जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थी