पहाडेश्वर येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 20:31 IST2019-08-07T20:29:35+5:302019-08-07T20:31:03+5:30
जुनी शेमळी : अजमेर सौंदाणे पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावण मास‘निमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करत आहे. सुंदर असा धबधबा, निसर्गरम्य वातावरण डोळ्याच पारणं फेडत आहे.

पहाडेश्वर येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण
जुनी शेमळी : अजमेर सौंदाणे पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावण मास‘निमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करत आहे. सुंदर असा धबधबा, निसर्गरम्य वातावरण डोळ्याच पारणं फेडत आहे.
बागलाण तालुक्यातील पहाडेश्वर येथील हा आकर्षक धबधबा असल्याने परिसरातील ग्रामस्थ मनमुराद आनंद घेत आहेत. सोशल मिडीयावर धबधब्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे पर्यटक गर्दी करत आहे. महिला देखील रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून धबधब्याचा आनंद घेत आहे.
धबधब्याचे झुळझुळ वाहणारे पाणी मुख्य आकर्षण आहे. सटाण्यापासून जवळच सदर धबधबा असल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. बऱ्याच वर्षात पहिल्यांदाच हा धबधबा सुंदर असा वाहताना दिसत आहे. पहाडेश्वर येथे श्री शंकराचे मंदिर आहे. श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यामुळे दोन दिवस झाले या ठिकाणी गर्दी होत आहे.
(फोटो ०७ पहाडेश्वर)
पहाडेश्वर येथील सुंदर असा धबधबा.