शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात रद्द; मात्र पुरवठा एकवेळच

By admin | Updated: August 5, 2014 01:58 IST

पाणीकपात रद्द; मात्र पुरवठा एकवेळच

 

नाशिक : शहराच्या पाणीपुरवठ्याला मनसेच्या राजकारणाचा रंग चढला आहे. गेल्या आठवड्यात मनसेचे शहराध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांनी शनिवारपासून पाणीकपात रद्द झाल्याची घोषणा केली होती. तथापि, मनसेच्या महापौरांनी अद्याप निर्णय झाला नाही, असे सांगितले होते. आज त्यांनी पाणीपुरवठ्याबाबत प्रतिघोषणा करीत, मंगळवारपासून संपूर्ण शहरातील पाणीकपात रद्द करण्यात येईल; मात्र शहरात एकवेळच पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती दिली.गेल्या शुक्रवारी स्थायी समिती सभापती राहुल ढिकले आणि गटनेता अशोक सातभाई यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची भेट घेतली आणि पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. ती मान्य झाल्याचे सांगून सभापती राहुल ढिकले यांनी शनिवारपासून पाणीकपात रद्द झाल्याची घोषणा केली होती. परंतु महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानंतर अखेरीस सोमवारी महापौर वाघ यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेथेच पत्रकार परिषद घेतली. मंगळवारपासून (दि. ५) पासून पाणीकपात रद्द करण्याची घोषणा करण्यात येईल, मात्र संपूर्ण शहरात एकवेळच पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले. सभापतींनी यापूर्वीच पाणीकपात रद्द केल्याची घोषणा केली असली तरी त्यांनी (सभापतींनी) निर्णय घेतला, आता मंगळवारपासून अंमलबजावणी होईल, असे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी सांगितले. विशेष म्हणजे शुक्रवारी सभापतींसमवेत असलेले मनसे गटनेता अशोक सातभाई यांनी त्यास दुजोरा दिला.गंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने पाऊस पडेपर्यंत पाण्याची बचत व्हावी, यासाठी महापालिकेने गेल्या ७ जुलैपासून शहरात सुमारे १५ टक्के पाणीकपात लागू केली होती. शहरातील सिडको आणि सातपूर या भागात एकवेळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या विभागाला वगळून पूर्व आणि पश्चिम नाशिक, पंचवटी आणि नाशिकरोड या विभागात ७ जुलैपासून दोनवेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला होता. आता मंगळवारपासून (दि.५) या सर्वच भागात एकवेळ पाणीपुरवठा कायम राहणार असला तरी त्यात वाढ केली जाणार असून, सुमारे ४५ मिनिटे ते दीड तास इतका कालावधी पाणीपुरवठ्यासाठी वाढवून दिला जाईल. (प्रतिनिधी)